Pulwama : पुलवामा सारख्या हल्ल्याने पाकिस्तान हादरला!

Pulwama

आत्मघातकी हल्ल्यात बस उडवली, 8 सुरक्षा जवान ठार


विशेष प्रतिनिधी

बलुचिस्तान : Pulwama पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये शनिवारी (४ जानेवारी २०२५) संध्याकाळी चालत्या बसमध्ये मोठा स्फोट झाला. या आत्मघातकी हल्ल्याने एक प्रवासी वाहन आणि पोलिसांच्या वाहनाला धडक बसली. आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बसमधील स्फोटात 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बहुतांश तरुण आहेत.Pulwama

या हल्ल्याने फेब्रुवारी 2019 मध्ये भारतात झालेल्या पुलवामा हल्ल्याची आठवण करून दिली. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यातील एका वाहनाला स्फोटकांनी भरलेल्या कारने धडक दिली होती.



द डॉनच्या वृत्तानुसार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तानचे पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी राबिया तारिक यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, कराचीहून तुर्बतला जाणाऱ्या बसला न्यू बहमन भागात लक्ष्य करण्यात आले.

राबिया तारिक यांनी सांगितले की, मोठ्या संख्येने सुरक्षा दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे क्वेटाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) जोहेब मोहसीन हे देखील आपल्या कुटुंबासह तुर्बतला जात असताना स्फोटात अडकले. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी एका निवेदनात सांगितले की, एसएसपी मोहसीन आणि त्यांच्या कुटुंबातील चार सदस्य किंचित जखमी झाले आहेत.

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सर्फराज बुगती यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून या हल्ल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे असे ते म्हणाले, “जे निष्पाप लोकांना टार्गेट करतात ते माणूस म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत.” या दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत आणि जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतो, असंही ते म्हणाले.

Pakistan is scared by Pulwama like attacks Bomb blast in bus kills eight soldiers

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात