विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – उईघुर मुस्लिमांच्या छळावरून चीनला भक्कम पाठिंबा प्रदर्शित करतानाच पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनच्या टीकाकारांना धारेवर धरले. चीनच्या शिनजियांग प्रांतामधील मानवी हक्कांच्या स्थितीबाबत सोईस्कर निष्कर्ष काढले जाऊ नयेत, तसे करणे अनैतिक आहे, असे परखड वक्तव्य इम्रान यांनी केले.Pakistan gave support to china
अशांत बनलेल्या प्रांतातील उईघुर मुस्लीमांवरील कथित अन्यायावरून अमेरिका आणि ब्रिटनने चीनवर वेळोवेळी टीका केली आहे. याविषयी इम्रान म्हणाले की, आम्ही याबाबत चीनशी चर्चा केली आहे आणि आम्हाला स्पष्टीकरण मिळाले आहे.
चीनबरोबरील आमचे संबंधच असे आहेत की आमच्यात एक सामंजस्य आहे. आम्ही एकमेकांशी चर्चा करतो, पण ती बंद खोलीत होते, कारण हाच आमचा स्वभाव तसेच संस्कृती आहे. ते म्हणाले आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानबरोबर संबंध निर्माण केले नाही तर गंभीर परिणाम होतील.
तालिबानमध्ये कट्टर लोक असतीलच, त्यामुळे मान्यता न मिळाल्यास २० वर्षांपूर्वीच्या तालिबानची पुनरावृत्ती होईल, जे मोठेच संकट ठरेल. तसे झाल्यास इसिससारख्या दहशतवादी संघटनांच्या पथ्यावर पडेल, या संघटनांना कारवायांसाठी अनुकूल भूभाग मिळेल
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App