• Download App
    PAK Political Crisis : सरकार पाडण्याच्या कटात हा अमेरिकन मुत्सद्दी होता सामील, इम्रान खान यांनी घेतल नाव, केला हा मोठा दावा|PAK Political Crisis US diplomat involved in plot to overthrow government, name taken by Imran Khan, made a big claim

    PAK Political Crisis : सरकार पाडण्याच्या कटात हा अमेरिकन मुत्सद्दी होता सामील, इम्रान खान यांनी घेतल नाव, केला हा मोठा दावा

    पाकिस्तानमधील सरकार पाडण्यासाठी परकीय षड्यंत्र असल्याचा दावा करणाऱ्या इम्रान खान यांनी प्रथमच एका अमेरिकन राजनैतिकाचे नाव घेतले आहे. अमेरिकेचे राजनयिक डोनाल्ड लू हे पाकिस्तान सरकार पाडण्याच्या कटात सामील असल्याचा दावा इम्रान खान यांनी रविवारी केला. डोनाल्ड हे यूएस स्टेट डिपार्टमेंटमध्ये दक्षिण मध्य आशिया विभागाचे सहाय्यक सचिव आहेत. आज पाकिस्तानच्या संसदेत फवाद चौधरी म्हणाले की, डोनाल्ड लू जे बोलले त्यामागे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा हात आहे.PAK Political Crisis US diplomat involved in plot to overthrow government, name taken by Imran Khan, made a big claim


    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानमधील सरकार पाडण्यासाठी परकीय षड्यंत्र असल्याचा दावा करणाऱ्या इम्रान खान यांनी प्रथमच एका अमेरिकन राजनैतिकाचे नाव घेतले आहे. अमेरिकेचे राजनयिक डोनाल्ड लू हे पाकिस्तान सरकार पाडण्याच्या कटात सामील असल्याचा दावा इम्रान खान यांनी रविवारी केला.

    डोनाल्ड हे यूएस स्टेट डिपार्टमेंटमध्ये दक्षिण मध्य आशिया विभागाचे सहाय्यक सचिव आहेत. आज पाकिस्तानच्या संसदेत फवाद चौधरी म्हणाले की, डोनाल्ड लू जे बोलले त्यामागे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा हात आहे.



    इम्रान खान यांनी देशाला संबोधित केल्यानंतर आज पहिले विधान केले. ते म्हणाले की, मी विरोधकांना आश्चर्यचकित केले आहे. विरोधकांना काय झाले ते समजले नाही. दरम्यान, विरोधकांना विदेशी मुत्सद्दी का भेटत आहेत, असा सवालही त्यांनी केला.

    फवाद चौधरींचा विरोधकांवर निशाणा

    पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री असलेले फवाद चौधरी म्हणाले, “आजच्या सभापतींच्या निर्णयाला कोणत्याही कोर्टात आव्हान देता येणार नाही. मी स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर यांना सलाम करतो… तुम्ही (विरोधक) निवडणुकीतून पळ काढताय. ह्या लोकांचे तोंड लटकले आहे.

    आम्ही आनंदी आहोत. राजकीय पक्ष असल्याने भीती कशाला? तुम्ही सिंहाचे छावे असाल तर निवडणूक लढवा.. का पळताय. आमची सत्ता जाऊनही आम्ही आनंदी आणि विरोधक रडत आहेत.

    नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर कासिम सूरी यांनी पंतप्रधानांना हटवण्यासाठी विरोधकांनी संयुक्तपणे मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला आणि घटनेच्या कलम 5 अंतर्गत “असंवैधानिक” असे म्हटले. यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रपतींना संसद बरखास्त करण्याची शिफारस केली. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधानांच्या शिफारशीला मान्यता दिली.

    PAK Political Crisis US diplomat involved in plot to overthrow government, name taken by Imran Khan, made a big claim

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या