विशेष प्रतिनिधी
लंडन – ब्रिटनमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युला आता चांगलाच ‘ब्रेक’ लागला आहे. ब्रिटनमध्ये गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे एकाचाही मृत्यु न होणे ही घटना दहा महिन्यात प्रथमच घडली आहे. No single death in Briton due to corona
मात्र तज्ञांनी ब्रिटन सरकारला तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असून २१ जून रोजी संपूर्णपणे निर्बंध काढून घेण्याचा निर्णय तीन चार आठवडे लांबणीवर टाकावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
दुसरीकडे ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून काल ३१६५ जणांना कोरोनाची लागण झाली. कोरोना डेल्टा व्हेरियंट हा संपूर्ण ब्रिटनमध्ये पसरत आहे. हा स्ट्रेन भारतात आढळून आला होता. गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णात किरकोळ वाढ नोंदली गेली. या ठिकाणी मे महिन्याच्या प्रारंभी दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण सापडत होते.
आता हाच आकडा चार हजारावर गेला आहे. १ जून रोजी ३१६५ जणांना बाधा झाली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४४.९० लाख जणांना बाधा झाली तर ४२.९१ लाख लोक बरे झाले. यादरम्यान २७,७८२ जणांचा मृत्यू झाला. सध्या ७१,१६९ जणांवर उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App