विशेष प्रतिनिधी
कंदाहार – अफगाणिस्तानात शासन कसे चालवावे, हे तालिबानला सांगायची गरज नाही. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे की येथे शरीयत कायद्याप्रमाणे शासन चालवले जाईल. अफगाणिस्तानात लोकशाही व्यवस्था नसेल. कारण त्याचे कोणतेही अस्तित्व नसल्याचे तालिबानचा नेता वहिदुल्लाह हाशिमी याने म्हटले आहे.No democracy in Afghanistan
हाशिमी म्हणाला की, अफगाणिस्तानात कशी व्यवस्था असावी यासाठी तालिबानकडून रणनीती आखली जात आहे. आतापर्यंतच्या योजनेनुसार तालिबानी हे अफगाणिस्तान कौन्सिलचे कामकाज पाहू शकतील. इस्लामी दहशतवादी चळवळीचा प्रमुख हैबतुल्लाह अखुंदजादा हे तालिबानच्या राजवटीचे प्रमुख होऊ शकतात.
हाशिमी याच्या मते, अखुंदजादाकडे तालिबानी कौन्सिलपेक्षा अधिक अधिकार असतील. त्याचा दर्जा अध्यक्षपदाच्या बरोबरीचा असेल. १९९६ ते २००१ या काळात तालिबानची राजवट होती.त्यानुसारच तालिबान राज्य करेल. तेव्हा मुल्ला उमर याने पडद्यामागून तालिबानची धुरा सांभाळली होती आणि दररोजच्या कामाची जबाबदारी परिषदेवर सोपवण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App