विज्ञानाची गुपिते : झाडातील विशिष्ठ् ग्रंथीमुळेच फुलांना येतो सुगंध


प्राचीन काळापासून माणूस फुले वापरतो तो त्याच्या आकर्षक रंगामुळे आणि त्याच्या सुवासामुळे. कोणत्याही चांगल्या प्रसंगी सुवासिक फुलांचा गुच्छ भेट दिला जातो. प्रत्येक फुलाला कोणतातरी सुगंध असतोच. काही फुलांचा सुगंध चांगला असतो तर काही फुलांचा वास खूपच उग्र असतो. कारण निसर्गानेच त्यांना तशी देणगी दिलेली असते. अतिशय मनमोहक सुंगध असणारी ही फुले सारा आसमंत सुगंधाने दरवळून टाकतात. The fragrance comes from the special glands in the plant

आजूबाजूचा सारा परिसर प्रफुल्लित करुन सोडतात. फुलांना इतका छान सुगंध कसा येतो असा प्रश्न आपल्याला सहजच पडतो. मात्र त्याच्या मुळाशी आपण कधी जात नाही. याबाबत शास्त्रज्ञांना आता संशोधन केले आहे. कोणत्याही वनस्पतीच्या फुलात, पानात, डहाळीत, मुळात सुंगध दडलेलाच असतो. हा सुंगध त्या झाडात असलेल्या विशिष्ठ् ग्रंथी तयार करतात. त्यांना सेंट ग्लॅंड असे म्हणतात.

जाई, जुई, मोगरा या सारख्या सुवासिक फुलांत या ग्रंथी त्यांच्या पाकळ्यांवर विखुरलेल्या असतात. फूल उमलत असताना या ग्रंथी हळूहळू योग्य तो सुगंध वातावरणात सोडायला सुरुवात करतात. या ग्रंथीतून सुगंधाचे प्रमाण संध्याकाळपासून रात्रीपर्यंत वाढत जाते. रात्रीच्या वेळी रातराणीचा सुगंध आपण सर्वांनी कधी ना कधी अनुभवलाच असेल. या सुगंधाचा वापर आपण करावा या हेतूने माणसांनी अत्तरे बनवण्यास सुरुवात केली.

आज सर्व प्रकराच्या फुलांच्या वासांची अत्तरे बाजारात उपलब्ध आहेत. या सुगंधामुळे किडेदेखील या फुलांकडे आकर्षीत होतात. याचा परागीकरणासाठी मोठा उपयोग होतो. त्यामुळेत फुलांत फलनीकरण होते व नव्या बीजाचे उत्पादन होते. निसर्गाची कमाल आपण अनेक टिकाणी अनुभवतो. साध्या फुलांत सुद्धा निसर्ग कीती रंग भरतो हे यावरुन सिद्ध होते.

The fragrance comes from the special glands in the plant

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात