विशेष प्रतिनिधी
ऑकलंड – भारतामधून येणाऱ्या आपल्या देशाच्या नागरिक आणि रहिवाशांसह सर्व प्रवाशांना प्रवेशास बंदी घालण्याचा निर्णय न्यूझीलंडने घेतला आहे. ११ ते २८ एप्रिल दरम्यान हा निर्णय लागू राहील. दक्षिण आशियाई देशांतून येणाऱ्या प्रवाशांत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. गुरुवारी २३ नव्या रुग्णांपैकी १७ जण भारतामधून आल्याची नोंद झाली. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. न्यूझीलंडने त्यांच्या नागरिक आणि देशातील रहिवाशांबाबत असा निर्णय प्रथमच घेतला आहे. New zeland bans Indians to enter the country
कोरोनाच्या जागतिक साथीविरुद्ध परिणामकारक उपाययोजना केलेल्या देशांत न्यूझीलंड आघाडीवर आहे. देशातील संसर्ग जवळपास नष्ट करण्यात त्यांना यश आले होते. सुमारे ४० दिवस सामुहिक संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नव्हता.
पंतप्रधान जेसिंडा अर्डेर्न यांनी हा निर्णय जाहीर केला. १४ दिवस भारतात असलेल्यांना प्रवेश मिळणार नाही. तात्पुरत्या बंदीच्या कालावधी संसर्गाचा धोका कसा हाताळायचा याचे नियोजन केले जाईल. त्यानंतर प्रवेशास पुन्हा परवानगी दिली जाईल. परदेशी जाण्यापूर्वी निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक असण्याची अट न्यूझीलंडने लागू केली आहे.
वाचा आणखी महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App