वृत्तसंस्था
पॅरिस : बाहेर देशांतील इमाम आता फ्रान्समध्ये काम करू शकणार नाहीत. यासाठी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारने नवा कायदा लागू केला आहे. ‘फॉक्स न्यूज’च्या वृत्तानुसार, जे विदेशी इमाम आधीच उपस्थित आहेत त्यांनाही परत पाठवले जाईल किंवा त्यांना स्थानिक मशिदींमध्ये काही छोटे काम दिले जाऊ शकते.New law against bigotry in France tough, bans entry of foreign imams, deports existing Islamic clerics
फ्रान्स सरकारने ‘फोरम ऑफ इस्लाम इन फ्रान्स’ नावाची संघटना तयार केली आहे. त्यात सर्व धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत. देशातील मुस्लिमांना योग्य मार्ग दाखवून त्यांना कट्टरतावादापासून दूर ठेवण्याची जबाबदारी या संघटनेची असेल.
मॅक्रॉन यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये पहिल्यांदा हा कायदा आणण्याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते- आपल्याला कट्टरता संपवायचा आहे. महिलांना समान दर्जा द्यावा लागेल. त्यांच्यावर दबाव आणता येणार नाहीत. ही आपल्या देशाची विचारसरणी आणि परंपरा आहे.
फ्रान्समध्ये 1977 मध्ये एक नियम करण्यात आला. याअंतर्गत चार मुस्लिम देशांना फ्रान्समध्ये त्यांचे इमाम पाठवण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यांच्यावर धर्म आणि इस्लामी संस्कृतीशी संबंधित जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. मात्र, आतापासूनच नव्या समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
न्यू हॅम्पशायर विद्यापीठातील राज्यशास्त्राच्या प्राध्यापक एलिझाबेथ कार्टर यांनी फॉक्स न्यूजला सांगितले – काही लोकांना आश्चर्य वाटते की ही संघटना खरोखरच फ्रान्सच्या मुस्लिमांना नेतृत्व प्रदान करण्यास सक्षम असेल का. फ्रान्सच्या मुस्लिमांवर नियंत्रण ठेवण्याचा हा कट आहे असे मानणारे काही लोक आहेत. तसेच, असे काही लोक आहेत ज्यांचा असा विश्वास आहे की मॅक्रॉन स्वत: फ्रान्सच्या कट्टरवाद्यांमध्ये आपली व्होट बँक वाढवू इच्छित आहेत.
अलीकडच्या काळात फ्रान्समध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत आणि त्यापैकी बहुतेकांमध्ये इतर देशांतून कायदेशीर आणि बेकायदेशीरपणे आलेले लोक सामील आहेत. 2015 मध्ये येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 130 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 500 जण जखमी झाले होते. एका अंदाजानुसार 1910 फ्रेंच वंशाचे लोक दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App