वृत्तसंस्था
पॅरिस : मर्यादेपेक्षा जास्त किरणोत्सर्गामुळे फ्रान्समध्ये आयफोन 12 च्या विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे. यावर अमेरिकन टेक कंपनी ॲपलने सॉफ्टवेअर अपडेट आणण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे अतिरिक्त किरणोत्सर्गाची समस्या दूर होईल, असा त्यांचा दावा आहे. फ्रान्सने या निर्णयाचे स्वागत केले आहे. दुसरीकडे, ॲपललाही आशा आहे की, सॉफ्टवेअर अपडेटनंतर फ्रान्स ही बंदी उठवेल.iPhone 12 sales banned in France; Since the radiation is high, the government took a decision
NDTV च्या रिपोर्टनुसार, फ्रान्सने दावा केला आहे की iPhone-12 मॉडेल युरोपियन युनियन (EU) मानकांपेक्षा जास्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करते.
ॲपल म्हणाले- ही चिंतेची बाब नाही
फ्रान्सच्या या निर्णयावर ॲपलने म्हटले आहे की, ‘आम्ही वापरकर्त्यांना फ्रेंच नियामकांच्या प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट जारी करू.’ ॲपलने स्पष्ट केले आहे की सुरक्षिततेबद्दल काळजी करण्याची गरज नाही, ही समस्या केवळ फ्रेंच नियामकांच्या विशिष्ट चाचणी प्रोटोकॉलशी संबंधित आहे.
अपडेटनंतरही रेडिएशन जास्त राहिल्यास, विक्रीवरील बंदी कायम राहील
डिजिटल मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘देशातील रेडिएशन वॉचडॉग सॉफ्टवेअर अपडेटची चाचणी EU मानकांच्या कक्षेत आहे की नाही हे शोधण्यासाठी वेगाने चाचणी करण्याची तयारी करत आहे. जर ते जास्त असेल तर iPhone-12 च्या विक्रीवर बंदी कायम राहील.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ॲपलने फ्रान्समध्ये आयफोन-12 च्या रेडिएशन विवादाबाबत कोणतेही विधान करण्यास किंवा त्यांच्या टेक सपोर्ट स्टाफला माहिती देण्यास नकार दिला आहे. याबाबत ग्राहकांनी प्रश्न विचारल्यास आमच्याकडे या विषयाची कोणतीही माहिती नसल्याचे त्यांना सांगावे, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
आयफोन-12 2020 मध्ये लाँच झाला होता, आता टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू आहे
ॲपलने 2020 मध्ये आयफोन-12 मॉडेल लाँच केले. हे कंपनीचे जुने मॉडेल आहे. अलीकडे, ॲपलने आयफोन-15 मालिका मॉडेल लॉन्च केले आहेत, तर आयफोन-12 आता टप्प्याटप्प्याने बंद होण्याच्या प्रक्रियेत आहे.
अहवालानुसार, ॲपसने गेल्या वर्षी युरोपमध्ये 50 दशलक्षाहून अधिक आयफोन विकले आणि $ 95 अब्ज कमाई केली. कंपनीसाठी अमेरिकेनंतर युरोप ही दुसरी मोठी बाजारपेठ आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App