नवाज शरीफ म्हणाले – भारतासोबतचे संबंध सुधारणे गरजेचे; माझ्या कार्यकाळात 2 भारतीय PM पाकिस्तानात आले


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे की, त्यांनी लष्कराच्या कारगिल योजनेला विरोध केल्यामुळे 1999 मध्ये त्यांना सत्तेतून काढून टाकण्यात आले होते. तसेच भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी नवाज यांनी भर दिला. नवाज म्हणाले- 1993 आणि 1999 मध्ये मला सत्तेवरून का हटवण्यात आले हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे.Nawaz Sharif said – It is necessary to improve relations with India; 2 Indian PMs came to Pakistan during my tenure

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान पुढे म्हणाले- मी कारगिल युद्धाबाबत म्हटले होते की ते योग्य नाही. त्यावर तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी मला पदावरून काढून टाकले. नंतर माझा मुद्दा खरा ठरला. आमच्या सरकारने प्रत्येक क्षेत्रात काम केले आहे. माझ्या कार्यकाळात भारताचे दोन पंतप्रधान वाजपेयी आणि मोदी पाकिस्तानात आले होते.शरीफ म्हणाले- इम्रानकडे अनुभवाची कमतरता आहे, त्यांना सत्ता देणे चुकीचे आहे.

शरीफ म्हणाले- भारत, अफगाणिस्तान आणि इराणसारख्या देशांशी संबंध सुधारण्याची गरज आहे. आपल्याला चीनशी मजबूत संबंध निर्माण करायचे आहेत. इम्रान खान यांच्या सरकारच्या काळात पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. त्यानंतर शाहबाज शरीफ यांनी एप्रिल 2022 मध्ये सत्ता हाती घेतली आणि देशाला गरिबीपासून वाचवले.

फेब्रुवारीमध्ये होणा-या निवडणुकीपूर्वी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नवाज म्हणाले- इम्रान खानसारख्या अनुभव नसलेल्या व्यक्तीकडे सत्तेची सूत्रे का दिली गेली, हे मला कळत नाही. मला माजी लष्करी जनरल आणि न्यायाधीशांनी 2017 मध्ये सत्तेवरून काढून टाकण्याचे कारण स्पष्ट करावे, असे मला वाटते.

Nawaz Sharif said – It is necessary to improve relations with India; 2 Indian PMs came to Pakistan during my tenure

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*