रहस्यमय : टोकियो विमानतळावर आलेला एक रहस्यमयी मनुष्य, कोण होता तो? टाईम ट्रॅव्हलर की दुसऱ्या जगातील माणूस?

विशेष प्रतिनिधी

टोकियो : ही गोष्ट आहे 1954 सालची. टोकियोमधील हानेडा एअरपोर्टवर एक अतिशय स्मार्ट ड्रेसमध्ये एक माणूस विमानातून उतरला. जेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी त्याचा पासपोर्ट चेक केला. तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये एक विचित्र नोंद आढळून आली.

Mysterious: A mysterious man who arrived at Tokyo airport, who was he? Time Traveler or a man from another world?

टॉरेड? हा कोणता देश?

त्या व्यक्तीच्या पासपोर्ट वर त्याच्या देशाचे नाव ‘टॉरेड’ असे लिहिले होते. त्या अधिकाऱ्याने हा देशाचे नाव याआधी कधीही ऐकलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या माणसाला विचारले की, तू कुठून आला आहेस? तो व्यक्ती म्हणाला की, ‘मी टॉरेड या देशातून आला आहे’. तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला विचारले की, ‘हा देश कुठे आहे? त्याने उतरत दिले, ‘ टॉरेड हा देश फ्रान्स आणि स्पेनच्या मध्ये आहे.’

इतकी चौकशी केल्यानंतर आणि समोरची व्यक्ती देखील न अडखळता पटापट उत्तरे देतीये म्हणून अधिकाऱ्यांनाही आता प्रश्न पडला की हा नेमका देश आहे कुठे. स्वत: कडून काही चूक होतीये का ह्याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी मॅपवर या देशाला शोधून पाहिले. पण त्यांना हा देश मात्र आढळून आला नाही.

तर विमानतळा वरील अधिकाऱ्यांनी या गूढ माणसाला चौकशीसाठी एका स्वतंत्र खोलीत घेऊन गेले. त्यावेळी त्याची कसून चौकशी केली. तो ह्या आधी कुठे गेला होता? जपान मध्ये कशासाठी आला आहे? ह्या सर्व गोष्टी विचारून घेतल्या.

तेव्हा त्याने सांगितले की, याआधी तो युरोप, आशिया, आफ्रिका सर्व देशांमध्ये जाऊन आलेला आहे. त्याचा एक बिझनेस आहे आणि जपानमधील एका कंपनीमध्ये बिझनेस मिटिंगसाठी तो आला आहे. त्याच्या पासपोर्ट आणि व्हिसाच्या मते या सर्व गोष्टींची नोंद होती. त्यांच्यामुळे त्याच्यावर शंका घ्यावी अशी कोणतीही गोष्ट आढळून आली नाही.


अडीच हजार वर्षापूर्वीच्या आणि २७५ फूट उंचीच्या जगातील सर्वांत उंच झाडाला आगीपासून वाचविण्याचे प्रयत्न


तरीदेखील पुन्हा एकदा खातरजमा करण्यासाठी त्यांनी त्या व्यक्तीला जगाचा मॅप दाखवला आणि त्याचा देश नेमका कुठे आहे हे सांगण्यास सांगितले. त्याने क्षणाचाही विलंब न करता फ्रान्स आणि स्पेनच्या मधील ‘अँडोरा’ या देशावर बोट ठेवले.

आता हा माणूस कुठून आला? कशासाठी? याची चौकशी केल्याशिवाय त्याला जाऊ न देण्याचा निर्णय सर्व विमानतळा वरील अधिकाऱ्यांनी मिळून घेतला. त्यामुळे त्यांनी एअरपोर्ट जवळच्या एका हॉटेल रूममध्ये त्या माणसाला एक दिवस राहण्यास सांगितले. त्याचा पासपोर्ट, वीजा सुरक्षित लॉकरमध्ये ठेवून दिले. तो माणूस रात्री पळून जाऊ नये म्हणून त्या हॉटेलच्या रुमच्या बाहेर दोन सुरक्षाकर्मी तैनात केले.

पण सकाळी उठून पाहतो तर तो माणूस गायब झालेला होता. तो माणूसच फक्त गायब झालेला नव्हता तर लॉकरमध्ये ठेवलेले त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा देखील गायब झालेला होता.

आजवरची ही जपानच्या इतिहासामधील सर्वात रहस्यमय घटना म्हणून ओळखले जाते. या घटनेनंतर त्या माणसाबरोबर बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. हा दुसर्या दुनियेतून आलेला माणूस होता, भूत होता, स्पाय होता. तसेच काही तर लोकांचे असे म्हणणे होते की तो टाइम ट्रॅव्हलर हाेता आणि चुकून इथे आला होता.

जपानमध्ये आजही या माणसाची गोष्ट सांगितली जाते. या घटनेवर आधारित एक पुस्तकदेखील प्रकाशित झालेले आहे. पण आजवर कोणालाही हा माणूस नेमका कोण होता? कुठून आला होता? याची काडीमात्र कल्पना नाही.

Mysterious: A mysterious man who arrived at Tokyo airport, who was he? Time Traveler or a man from another world?

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub