विशेष प्रतिनिधी
ब्यूएनोस आअर्स – लियोनेल मेस्सीने विश्वकरंडक पात्रता फेरीच्या सामन्यात गोल्सची हॅट्ट्रिक करत अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला आहे. मेस्सीने केलेल्या जबरदस्त खेळीमुळे अर्जेंटिनाने ३-० ने बोलिवियाचा पराभव केला. या हॅट्ट्रिकसोबतच मेस्सीने ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांचा सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला आहे.Messi did hattric once again
आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅट्ट्रिक करण्याची ही मेस्सीची ही सातवी वेळ आहे. मेस्सीने सामन्याच्या १४ व्या, ६४ व्या आणि ८८ व्या मिनिटाला तीन गोल केले. अर्जेंटिनाकडून १५३ वा सामना खेळताना मेस्सीने पहिला गोल करतच पेले यांच्या सर्वाधिक गोल्सची बरोबरी केली. यानंतर मार्टिनेजने केलेल्या पासवर गोल करत मेस्सीने पेले यांचा विक्रम मोडत नवा इतिहास रचला आहे.
दक्षिण अमेरिकी फुटबॉलच्या इतिहासात मेस्सी सर्वाधिक गोल करणारा आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू ठरला आहे. ३४ वर्षीय मेस्सीच्या नावे ७९ गोल्सची नोंद झाली आहे. आतापर्यंत ७७ गोल्ससह पेले यांच्या नावावर हा विक्रम होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App