Demonstration On The Streets Of Berlin : जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये शेकडो लोकांनी लैंगिक समानतेच्या मागणीसाठी रस्त्यावर टॉपलेस होऊन आंदोलन केले. या आंदोलनात मुख्यतः महिलांचा सहभाग होता. महिलांनी येथे रस्त्यांवर कपड्यांशिवाय सायकली चालवत महिलांच्या समान लैंगिक हक्कांसाठी आवाज उठवला. Men in bras, women topless, Know reason behind this demonstration on the streets of Berlin
वृत्तसंस्था
बर्लिन : जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये शेकडो लोकांनी लैंगिक समानतेच्या मागणीसाठी रस्त्यावर टॉपलेस होऊन आंदोलन केले. या आंदोलनात मुख्यतः महिलांचा सहभाग होता. महिलांनी येथे रस्त्यांवर कपड्यांशिवाय सायकली चालवत महिलांच्या समान लैंगिक हक्कांसाठी आवाज उठवला. या आंदोलनाची चर्चा जगभर सुरू आहे. आंदोलनामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. एका फ्रेंच महिलेला शहरातील बगिचामधून विना टॉप ऊन खात पहुडल्याच्या आरोपावरून हाकलण्यात आले होते.
स्थानिक माध्यमांनुसार, फ्रेंच महिला एक मित्र आणि दोन मुलांना स्वीम पार्कमध्ये खेळण्यासाठी घेऊन गेली होती. यादरम्यान गॅब्रिएलाने स्विमसूट परिधान केला होता. जेव्हा पोलिसांनी महिलेला आपले अंग झाकण्यास सांगितले तेव्हा तिने वारंवार प्रश्न केला की, तिने असे का करावे? महिलेने प्रश्न केला की, पुरुष विना टॉप गार्डनमध्ये फिरू शकतात, मग ती का नाही?
फ्रेंच नागरिक गॅब्रिएल लेब्रेटनला पोलिसांनी बर्लिन वॉटर पार्कमधून बाहेर काढले होते, कारण तिने आपले शर्ट काढून उन्ह शेकत होती. महिलेला पोलिसांकडून कपडे घालण्यास सांगण्यात आले होते, परंतु नकार दिल्याने त्यांनी तिला पार्कबाहेर काढले. या सार्वजनिक ठिकाणी झालेल्या कारवाईने बर्लिनमधील महिला वर्ग नाराज झाला आहे.
शनिवार, 10 जुलै रोजी दुपारी बर्लिनच्या मारिएनप्लेट्समधील महिलांनी अधिकाऱ्यांच्या निर्णयाचा निषेध करत समानतेची मागणी केली. या निदर्शनात शेकडो पुरुष व स्त्रियांनी टॉपलेस होऊन सहभाग नोंदवत सरकारसमोर आपली मागणी मांडली. आंदोलनात सहभागी पुरुषांनी निषेधार्थ ब्रा घातले होते, तर महिला टॉपलेस होत्या. अनेकींनी आपल्या शरीरावर ‘माय बॉडी, माय चॉईस’ असे स्लोगन्सही लिहिले होते.
विशेष म्हणजे समानतेसाठी होणार्या या निदर्शनामध्ये ड्रेस कोड टॉपलेस असावा, याची कठोरपणे अंमलबजावणी केली गेली. तथापि, यावेळी काही महिलांनी त्यांच्या शरीरावर टिन्सेल, विंग आणि बॉडी पेंटिंगदेखील लावली होती. पुरुषांनाही या आंदोलनात ब्रा घालून सहभागी होण्यास सांगण्यात आले. फ्रेंच नागरिक गॅब्रिएल लेब्रेटन यांना बर्लिनच्या पार्कमधून सुरक्षा दलाने हाकलल्यामुळे हे अनोखे आंदोलन झाले, ज्याची जगभर चर्चा सुरू आहे.
Men in bras, women topless, Know reason behind this demonstration on the streets of Berlin
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App