बीजिंगच्या रुग्णालयात भीषण आग, 21 ठार, 71 जणांची सुटका, मृतांची संख्या वाढण्याची भीती

वृत्तसंस्था

बीजिंग : चीनच्या राजधानीतील एका मोठ्या हॉस्पिटलला मंगळवारी आग लागली. यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाला. चेनफेंग गव्हर्नमेंट केअर सेंटर नावाच्या हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार- फायर सेफ्टी डिपार्टमेंटने 71 लोकांना बाहेर काढले. बहुतेक जखमींचा रुग्णालयात मृत्यू झाला.Massive fire at Beijing hospital, 21 dead, 71 rescued, death toll feared to rise

याशिवाय आणखी एक घटना घडली. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला.

खिडकीतून लोकांनी मारल्या उड्या

एक अधिकारी म्हणाला – ही अत्यंत खेदजनक घटना आहे. मी स्वतः माझ्या घराच्या खिडकीतून ही घटना पाहिली. एअर कंडिशनिंग युनिटच्या वर काही लोक उभे होते. त्यावर काहींनी उड्या मारल्या. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.



आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे – याचे कारण शॉर्ट सर्किटदेखील असू शकते. आम्ही तपास करत आहोत. आग कशामुळे लागली हे सध्या तरी सांगणे कठीण आहे. आतापर्यंत सर्च ऑपरेशनच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे.

कारखान्यालाही आग, 11 जणांचा मृत्यू

रुग्णालयाव्यतिरिक्त, वुई काउंटीमधील एका कारखान्यालाही मंगळवारी आग लागली. यामध्ये 11 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या कारखान्यातील केमिकल युनिटमध्ये ही आग लागली. पोलिसांनी सांगितले- आपत्कालीन वैद्यकीय सेवेने लवकरच बचाव कार्य सुरू केले. त्यामुळे फारसे नुकसान होऊ शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारखान्यात लाकडी दरवाजे बनवले जात होते. यासाठीची रसायने एका भागात होती, जी पॉलिशसाठी वापरली जातात. कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे आग लागली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कारखान्याच्या मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Massive fire at Beijing hospital, 21 dead, 71 rescued, death toll feared to rise

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात