Mars Mission : चीनला मंगळ ग्रहावर आपले रोव्हर उतरवण्यात यश मिळाले आहे. शनिवारी चीनचे सहा चाकांचे ‘जू रोंग’ यान लाल ग्रहावर उतरले. चीनच्या नॅशनल स्पेस मॅनेजमेन्टने ही माहिती दिली आहे. मंगळावर यशस्वीपणे रोव्हर उतरविणारा चीन जगातील दुसरा देश ठरला आहे. अमेरिकेने यापूर्वीही ही कामगिरी केली होती. Mars mission China succeeds in landing six-wheeled Xu Rong rover on red planet, India also prepares for mangalyan-2 next year
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनला मंगळ ग्रहावर आपले रोव्हर उतरवण्यात यश मिळाले आहे. शनिवारी चीनचे सहा चाकांचे ‘जू रोंग’ यान लाल ग्रहावर उतरले. चीनच्या नॅशनल स्पेस मॅनेजमेन्टने ही माहिती दिली आहे. मंगळावर यशस्वीपणे रोव्हर उतरविणारा चीन जगातील दुसरा देश ठरला आहे. अमेरिकेने यापूर्वीही ही कामगिरी केली होती.
चीनच्या अंतराळ यानाचे नाव तियानवेन-1 आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये हे यान प्रक्षेपित झाले होते. या यानातील रोव्हरचे नाव ‘जू रोंग’ असे आहे. चीनच्या पौराणिक अग्नी आणि युद्ध देवताच्या नावावर या रोव्हरचे नाव ठेवण्यात आले. आता हे रोव्हर मंगळाचे हवामान आणि भूगर्भशास्त्रावर संशोधन करणार आहे.
रोव्हर म्हणजे एक छोटे अंतराळ रोबोट असते, यात चाके लावलेली असतात. जू रोंग सहा चाकांचे रोव्हर आहे. हा रोव्हर मंगळाच्या उत्तर गोलार्धातील यूटोपियाच्या प्लेनिशिया या भागात उतरले. या रोव्हरमध्ये चीनने संरक्षणात्मक कॅप्सूल, एक पॅराशूट आणि रॉकेट प्लेफॉर्मचा वापर केला आहे.
मंगळाच्या युटोपिया भागातून हे रोव्हर चीनला छायाचित्रे पाठवेल. यावर चिनी अभियंते अनेक वर्षांपासून संशोधन करत होते. मंगळाचे सध्याचे अंतर 32 दशलक्ष किलोमीटर आहे, याचा अर्थ पृथ्वीवर रेडिओ संदेश पोहोचण्यास 18 मिनिटे लागतील. जर जू रोंग रोव्हर पुढील 90 दिवस मंगळावरून माहिती संकलित करून पाठविण्याच्या मोहिमेत यशस्वी ठरले, तर चीन अमेरिकेनंतर यश मिळवणारा जगातील दुसरा देश असेल.
मंगळ ग्रह हा कठीण आणि आव्हानात्मक वातावरणासाठी ओळखला जातो. येथे धुळीची शक्तिशाली वादळे येतात. कोणत्याही अंतराळ मोहिमेसाठी हे सर्वात मोठे आव्हान आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने लिहिले आहे की, मार्स मिशनने यशस्वी लँडिंगसह एक मैलाचा दगड पार केला आहे.
5 नोव्हेंबर 2013 रोजी भारताने मार्स ऑर्बिटर मिशन (मॉम) या नावाचे अंतराळयान लाल ग्रहाकडे रवाना केले होते. 24 सप्टेंबर 2014 रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचले होते. पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला, 450 कोटी रुपये खर्चाची ही सर्वात स्वस्त मंगळ मोहीम ठरली. भारताच्या मोहिमेने मंगळाचे चंद्र फोबोस आणि डेमोस यांना कॅमेऱ्यात कैदे केले, याशिवाय मंगळावरील धुळीची वादळे शेकडो किमी उंचीपर्यंत असल्याचेही संकेत दिले. भारताताची अंतराळ संस्था इस्रो 2022 मध्ये त्यांच्या मंगळयान -2 या दुसर्या मोहिमेवर काम सुरू करणार आहे. मंगळावरील जीवनाच्या उत्पत्तीसाठी महत्त्वाचे घटक शोधणे हे याचे उद्दिष्ट असेल.
Mars mission China succeeds in landing six-wheeled Xu Rong rover on red planet, India also prepares for mangalyan-2 next year
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App