विशेष प्रतिनिधी
लखनऊ : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा घेतल्यामुळे भारतातही अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. समाज वादी पक्षातील अनेक नेते हिंसक तालिबानच्या कारवाईच्या समर्थनात वक्तव्य करून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचीच भाषा बोलत आहेत. Many in India were overjoyed when the Taliban came to power, Samajwadi Party leaders also started speaking Imran Khan’s language
समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची लढाई ही स्वातंत्र्यासाठी आहे, अशी मुक्ताफळं बर्क यांनी उधळली आहेत. तालिबान अफगाण नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी लढाई लढत आहे. अफागाणिस्तानचे स्वातंत्र्य हा त्यांचा मुद्दा आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे राज्य का आहे? तालिबान तिथली एक शक्ती आहे आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना त्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य हवे आहे, असं बर्क म्हणाले.
उत्तर प्रेदशातील प्रादेशिक पक्ष असलेल्या पीस पक्षाचे प्रवक्ते शादाब चौहान यांनीही तालिबानचे समर्थन केले आहे. अमेरिका आणि तालिबानमध्ये शाततेसाठी चर्चा सुरू होती तेव्हा भारताचाही प्रतिनिधी तिथे होता. भारत सरकारने त्यावेळी विरोध केला नाही. मग आपल्या शेजारी देशात स्थापन होत असलेल्या सरकारशी का शत्रुत्व घ्यायचं, असं शादाब चौहान म्हणाले.
पीस पक्षाचे नेते फैज अहमद फैज यांनीही सुरात सूर मिळवला. अफगाणिस्तानमध्ये सत्ता परिवर्तन नाही, व्यवस्था परिवर्तन झाले आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा जगातील प्रत्येक नागरिकाला हा अधिकार आहे, असं फैज म्हणाले.
तालिबानला समर्थन देणाऱ्यांमध्ये जामियाचा ‘विद्यार्थी’ आणि दिल्ली दंग्याचा आरोपी आसिफ इकबाल तन्हा चाही यात समावेश आहे. इकबाल आणि त्याच्या काही साथीदारांनी तालिबानी राजवट आल्यावर आनंद व्यक्त केला होता.
विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानी सत्तेचे स्वागत केले आहे. अफगाणिस्तानने गुलामीचे जोखड फेकून दिले असल्याचे त्यांनी म्हटले. भारतातील काही जण त्यांचीच भाषा बोलू लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App