विशेष प्रतिनिधी
काबूल – तालिबानी राजवटीपासून सुटका मिळविण्यासाठी देश सोडून जाऊ इच्छिणारे शेकडो लोक अद्यापही अफगाणिस्तानात अडकून पडले आहेत. यामध्ये अनेक अमेरिकी नागरिकांचा समावेश असून त्यांना नेण्यासाठी आलेली चार खासगी विमाने मझार ए शरीफ येथील विमानतळावरच उभी आहेत. त्यांना तालिबानने अद्याप उड्डाणाची परवानगी दिलेली नाही. Lot of peoples stayed in afghan wants to fly
या सर्वांना अफगाणिस्तानच्या बाहेर जाऊ देण्याच्या बदल्यात अमेरिकेकडून अनेक मागण्या मंजूर करवून घेण्याचा तालिबानचा डाव असल्याची शंकाही समितीने व्यक्त केली आहे.
‘आमचे लोक विमानात बसलेले आहेत, मात्र विमान उड्डाणास परवानगीच मिळत नाही. याचाच दुसरा अर्थ म्हणजे, अमेरिकेच्या लोकांना तालिबानने ओलिस ठेवले आहे,’ असा आरोप अमेरिकी संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीने केला आहे.
अडकून पडलेल्या नागरिकांपैकी काही जण अमेरिकेचे असले तरी बहुतांशी लोक अफगाणीच असल्याचे मझार ए शरीफ विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या अफगाणी लोकांकडे पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याचाही दावा या अधिकाऱ्याने केला. मात्र, या लोकांची सुटका करण्यासाठी अमेरिकेवर दबाव वाढत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App