Lockdown In Bangladesh : बांग्लादेशात कोरोनाचा भयंकर उद्रेक, देशात 5 एप्रिलपासून 7 दिवसांचे लॉकडाऊन

Lockdown In Bangladesh For 7 days from April 5th

Lockdown In Bangladesh : कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जगात पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. बांग्लादेशातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक दिसून आला आहे. देशातील मोठ्या संख्येने लोक कोरोनामुळे संसर्गित आहेत. बांग्लादेशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 6,469 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाला सुरुवात झाल्यापासून 2021 मध्ये एका दिवसातील सर्वात जास्त संख्येने रुग्ण आढळले आहे. देशातील संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 6,17,764 पर्यंत गेली आहे. Lockdown In Bangladesh For 7 days from April 5th


विशेष प्रतिनिधी

ढाका : कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जगात पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. बांग्लादेशातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक दिसून आला आहे. देशातील मोठ्या संख्येने लोक कोरोनामुळे संसर्गित आहेत. बांग्लादेशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 6,469 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाला सुरुवात झाल्यापासून 2021 मध्ये एका दिवसातील सर्वात जास्त संख्येने रुग्ण आढळले आहे. देशातील संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 6,17,764 पर्यंत गेली आहे.

हजारो रुग्ण दगावले

कोरोनामुळे बांग्लादेशात हजारो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. मागच्या काही काळापासून कोरोना महामारी येथे आऊट ऑफ कंट्रोल झाली आहे. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी बांग्लादेशच्या शेख हसीना सरकारने लॉकडाउन लादण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी, 5 एप्रिलपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

पंतप्रधान हसीना यांचे मदतीचे आवाहन

पंतप्रधान शेख हसीना यांनी संसदेत निवेदन केले आणि देशातील कोरोना प्रकरणात सतत होणाऱ्या वाढीबद्दल लोकांना अधिक सावध राहण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, “आम्हाला परिस्थिती नियंत्रणात आणावी लागेल, आम्ही विषाणूवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण यावर मात करण्यासाठी लोकांच्या मदतीची गरज आहे.” लॉकडाऊनदरम्यान बांग्लादेशातील कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांची उपस्थिती केवळ 50 टक्के ठेवण्यात येणार आहे. दुसरीकडे, सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि इतर समारंभांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Lockdown In Bangladesh For 7 days from April 5th

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात