वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन राधा अय्यंगार प्लंब यांना पेंटागॉनच्या (संरक्षण विभागाचे मुख्यालय) मोठ्या पदासाठी नॉमिनेट केले आहे. राधा सध्या संरक्षण उपमंत्र्यांचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. जो बायडेन यांनी त्यांना डिफेन्स फॉर अॅक्विजिशन अँड सस्टेनमेंटच्या डेप्युटी अंडर सेक्रेटरी पदासाठी नॉमिनेट केले आहे.Joe Biden gave a big responsibility to Indian American Radha Iyengar nominated for a big post in Defense Ministry
राधा यांनी गुगल आणि फेसबुकमध्येही केले आहे काम
संरक्षण मंत्रालयात काम करण्यापूर्वी राधा यांनी गुगल आणि फेसबुकमध्येही काम केले आहे. Facebook मधील धोरण विश्लेषणाचे जागतिक प्रमुख आणि Google मधील डेटा सायन्स टीममध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.
याशिवाय त्यांनी ऊर्जा मंत्रालय आणि व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतही अनेक पदांवर काम केले आहे.
अर्थशास्त्रात पीएचडी आणि एमएस राधा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये असिस्टंट प्रोफेसर होत्या. हार्वर्डमध्ये पोस्टडॉक्टरल म्हणून काम केले. त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी आणि एमएस आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीएस केले आहे.
4 महिन्यांत 4 भारतीय-अमेरिकन राजदूत नियुक्त
एक महिन्यापूर्वी व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी केले होते की, जो बायडेन भारतीय-अमेरिकन गौतम राणा यांना स्लोव्हाकियातील अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून नियुक्त करण्यास तयार आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन मुत्सद्दी रचना सचदेवा यांची माली येथील राजदूत म्हणून नियुक्ती केली होती.
मार्चमध्ये पुनीत तलवार यांची मोरोक्कोमधील राजदूत आणि शेफाली राजदान दुग्गल यांची नेदरलँडमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App