वृत्तसंस्था
कंदहार /नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानने सत्तेवर कब्जा केल्यानंतर तालिबानच्या मुखातून शांततेची भाषा येत असली तरी त्यांची कृती मात्र अजूनही दहशतवादाच्या दिशेने चालल्याचे दिसते आहे. तालिबानच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांची संबंध प्रस्थापित केले असून त्यापैकी कट्टर भारतविरोधी असणाऱ्या जैश ए मोहम्मद या संघटनेच्या म्होरक्यांनी तालिबानच्या म्होरक्यांची कंदहार मध्ये जाऊन भेट घेतली आहे.Jaish-e-Mohammed – Discussion of Taliban leaders in Kandahar; Red alert of attack in Jammu and Kashmir
दोन्ही संघटनांच्या म्होरक्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखली असून त्याविषयीचा गुप्त रिपोर्ट केंद्रीय गुप्तचर खात्याने जम्मू-काश्मीरच्या गुप्तचर खात्याला दिला आहे. 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय गुप्तचर खात्याने हा रिपोर्ट सोपविण्याचे सूत्रांनी सांगितले.
तालिबानने 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानातील सत्ता कब्जात घेतली. त्यानंतर पहिल्याच आठवड्यात जैश ए मोहम्मद या संघटनेच्या म्होरक्यांनी तालिबानच्या म्होरक्यांशी चर्चा केल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
Pakistan based Jaish-e-Mohammad met Taliban leadership, Indian security agencies issue alerts Read @ANI story | https://t.co/LEGPbwrwsI#Pakistan #Taliban #JeM pic.twitter.com/dxw0VSmYAZ — ANI Digital (@ani_digital) August 28, 2021
Pakistan based Jaish-e-Mohammad met Taliban leadership, Indian security agencies issue alerts
Read @ANI story | https://t.co/LEGPbwrwsI#Pakistan #Taliban #JeM pic.twitter.com/dxw0VSmYAZ
— ANI Digital (@ani_digital) August 28, 2021
तालिबानच्या प्रवक्त्यांच्या तोंडी भारताशी चांगले संबंध राहण्याची भाषा आहे. परंतु, प्रत्यक्षात त्यांचे इरादे वेगळे असल्याचे जैश ए मोहम्मद आणि तालिबान यांच्या म्होरक्यांच्या भेटीतून समोर येत आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून जैश ए मोहम्मद राज्यात मोठे हल्ले करण्याचे मनसुबे आखत आहे. यासाठी त्यांना तालिबानची मदत हवी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App