महिलांच्या सुटकेनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी कतारचे आभार मानले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आज (शनिवार) 14 वा दिवस आहे. दरम्यान, हमासने दोन आठवड्यांपूर्वी ओलीस ठेवलेल्या दोन अमेरिकन महिलांची सुटका केली आहे. या दोघींमध्ये आई आणि मुलीचे नाते आहे. त्यांच्या सुटकेनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी कतारचे आभार मानले. यासोबतच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या महिलांशी बोलून त्यांची विचारपूसही केली. Israel Hamas War Two American women held hostage by Hamas freed after 14 day Joe Biden said
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सुटका झालेल्या दोन महिलांशी फोनवर संवाद साधला. ते म्हणाले, नुकत्याच सुटका झालेल्या आमच्या दोन महिला नागरिकांशी मी बोललो. मी त्यांना विचारले की तुम्ही ठीक आहात का?, अमेरिकन सरकार त्यांच्यासोबत आहे. याचबरोबर ते म्हणाले, जिल आणि मी लाखो अमेरिकन लोकांसोबत कायम उभे आहोत.
अन्य एका ट्वीटमध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले की, मी इस्रायलच्या पंतप्रधानांशी बोललो आणि पुन्हा त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय, मी त्यांच्याशी गाझाला मानवतावादी मदत देण्याबाबत बोललो आणि युद्ध त्याच्या मर्यादेत लढण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला. याचबरोबर हमासने ओलीस ठेवलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबद्दलही बोललो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App