Israel Hamas War : बायडेनसोबत अरब नेत्यांची शिखर बैठक रद्द, गाझा हॉस्पिटलवर हल्ल्यानंतर वाढला तणाव!

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्यासाठी हमासच्या दहशतवाद्यांना जबाबदार धरले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इस्रायल-हमास युद्धादरम्यान गाझा येथील हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. या हल्ल्याने इस्रायलच्या स्वत:चा बचाव करण्याच्या अधिकाराला पाठिंबा मिळवण्याच्या अमेरिकेच्या राजनैतिक प्रयत्नांना खीळ बसली आहे. अम्मान, जॉर्डन येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत अरब नेत्यांची शिखर परिषद रद्द करण्यात आली आहे. इस्रायलला पाठिंबा आणि एकजुट व्यक्त करण्यासाठी बायडेन आज तेल अवीव येथे पोहोचले आहेत. Israel Hamas War Summit meeting of Arab leaders canceled with Biden tension increased after attack on Gaza hospital

गाझाच्या अल-अहली अरब रुग्णालयावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यासाठी हमास आणि इस्रायलने एकमेकांवर आरोप केले आहेत. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, इजिप्त, जॉर्डन आणि तुर्कस्तान यांनीही इस्रायलवर गाझा शहरातील अल-अहली अरब रुग्णालयात बॉम्बस्फोट केल्याचा आरोप केला आहे. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्यासाठी हमासच्या दहशतवाद्यांना जबाबदार धरले आहे.

जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री अयमान सफादी यांनी जाहीर केले की जॉर्डनचे राजे अब्दुल्ला, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी आणि पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांची अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्यासोबत अम्मानमध्ये बुधवारी होणारी शिखर बैठक रद्द करण्यात आली आहे.

गाझा शहरातील अल-अहली अरब हॉस्पिटलमध्ये मंगळवारच्या स्फोटानंतर लगेचच इस्रायली लष्करी हवाई हल्ल्यांना हमासने जबाबदार धरले. यानंतर इस्रायली लष्कराने एक निवेदन जारी करून हे आरोप फेटाळून लावले असून इस्लामिक जिहाद गटाकडून चुकीच्या रॉकेट हल्ल्यात  हा स्फोट झाल्याचे म्हटले आहे.

Israel Hamas War Summit meeting of Arab leaders canceled with Biden tension increased after attack on Gaza hospital

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात