गाझा रुग्णालयावर इस्रायलने हल्ला केला नाही, इस्लामिक जिहादचेच रॉकेट झाले मिसफायर – नेतान्याहूंनी केले स्पष्ट!

”ज्या लोकांनी आमच्या मुलांना क्रूरपणे मारले, ते आता…” असंही नेत्यान्याहूं यांनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली  : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याची चिन्हं दिसत नाही. यामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूचे 4500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आज तेल अवीव येथे इस्रायलला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि एकजूट दाखवणार  आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा हमासने दावा केला की, इस्रायली सैन्याने गाझामधील एका रुग्णालयावर हल्ला केला, ज्यामध्ये आतापर्यंत 500 लोकांचा मृत्यू झाला आहे.तर  इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनीही हमासच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे. Israel did not attack the Gaza hospital it was the Islamic Jihads rocket misfired  Netanyahu

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन म्हणाले की, ”गाझामधील अमानवी हल्ला इस्रायली लष्कराने नव्हे तर हमासच्या  दहशतवाद्यांनीच केला हे संपूर्ण जगाला कळले पाहिजे. ज्या लोकांनी आमच्या मुलांना क्रूरपणे मारले, ते आता स्वतःच्या मुलांनाही मारत आहेत.”

यापूर्वी माहिती देताना IDF ने हॉस्पिटलवरील हल्ल्याला इस्लामिक जिहाद जबाबदार असल्याचे म्हटले होते. आयडीएफने सांगितले की, शत्रूने इस्रायलवर अनेक रॉकेट सोडले, त्यापैकी एक मिसफायर झाला आणि त्याने गाझामधील रुग्णालयाला लक्ष्य केले. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या विविध गुप्तचर माहितीनुसार, रूग्णालयावरील या रॉकेट हल्ल्याला इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटना जबाबदार आहे.

मध्य गाझा येथील अल अहली हॉस्पिटलवर हा हवाई हल्ला झाला. गाझा पट्टीतील शेवटचे ख्रिश्चन रुग्णालय असे त्याचे वर्णन केले जात आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाने दावा केला होता की इस्रायली सैन्याने मंगळवारी रात्री अल अहली अरेबिक बॅप्टिस्ट हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला. या रुग्णालयात मोठ्या संख्येने जखमी आणि इतर पॅलेस्टिनी आश्रय घेत होते.

Israel did not attack the Gaza hospital it was the Islamic Jihads rocket misfired  Netanyahu

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात