याआधीही इराणच्या सर्वोच्च नेत्याने भारताविरोधात वक्तव्ये केली होती. Iran
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Iran भारताविरोधात अनेकदा भाष्य करणारे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी पुन्हा एकदा भारतात मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे म्हटले आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाने जोरदार टिप्पणी केली.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “आम्ही इराणच्या सर्वोच्च नेत्याने भारतातील अल्पसंख्यांकांबद्दल केलेल्या टिप्पण्यांचा तीव्र निषेध करतो. ही चुकीची माहिती देणारी आणि अस्वीकार्य आहे. भारतातील अल्पसंख्याकांवर टिप्पणी करणाऱ्या देशांनी आधी आपल्याकडे काय परिस्थिती आहे एकदा बघावे.”
Dhangar : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सोमवारी, प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त, अयातुल्ला अली खामेनी म्हणाले की जगभरातील मुस्लिमांमध्ये एकतेची गरज आहे. ट्विटरवर पोस्ट करताना खामेनी यांनी लिहिले की, म्यानमार, गाझा, भारत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मुस्लिमांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबाबत आपण दुर्लक्ष करत असू तर आपण स्वत:ला मुस्लिम समजू नये.
याआधीही इराणच्या सर्वोच्च नेत्याने भारताविरोधात वक्तव्ये केली आहेत. 2019 मध्ये, जेव्हा जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले, तेव्हा अयातुल्ला अली खामेनी यांनी काश्मीरमधील मुस्लिमांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more