वृत्तसंस्था
बाली : इंडोनेशियातील माउंट रुआंग येथे मंगळवारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. स्फोटानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत विमानतळ बंद ठेवण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.Indonesia volcano erupts for sixth time in 14 days; 11 thousand people rescued, airport closed; Tsunami warning
रुआंग परिसरात राहणाऱ्या 11 हजार लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. तसेच पाच किलोमीटरच्या आत कोणालाही जाण्यास मनाई आहे. स्फोटानंतर सर्वत्र अंधार पसरला होता. त्यानंतर वीज कडाडून भूकंपाचे धक्केही जाणवले.
14 दिवसांत सहाव्यांदा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. 16 आणि 30 एप्रिलला प्रत्येकी एकदा आणि 17 एप्रिलला चार वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ज्वालामुखीचा पहिला स्फोट 16 एप्रिल रोजी रात्री 9:45 वाजता झाला. कतारच्या मीडिया अलजजिरानुसार, 17 एप्रिल रोजी माउंट रुआंगवरील ज्वालामुखीचा 4 वेळा उद्रेक झाला होता. त्यामुळे हजारो फूट उंचीवर लावा उठला आणि राख पसरली.
यापूर्वी 1871 मध्ये इंडोनेशियामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.
भूकंपामुळे ज्वालामुखीचा उद्रेक झाला
इंडोनेशियातील आपत्ती केंद्र अलर्ट मोडवर आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की नुकतेच माउंट रुआंगजवळ दोन भूकंप झाले. यामुळे, टेक्टोनिक प्लेट्स अस्थिर झाल्या, ज्यामुळे ज्वालामुखीचा उद्रेक झाला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकांना वाचवण्यासाठी 20 बचाव कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अलजझीराच्या वृत्तानुसार, इंडोनेशियाच्या ज्वालामुखी एजन्सीने धोक्याच्या पार्श्वभूमीवर लेव्हल 4 चा इशारा जारी केला आहे. याशिवाय ज्वालामुखीजवळील 6 किमीचा परिसर विशेष क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
इंडोनेशियामध्ये 120 सक्रिय ज्वालामुखी
इंडोनेशियाच्या जिओलॉजिकल एजन्सीचे अध्यक्ष म्हणाले, “रुआंग ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर राखेचा ढग आकाशात 2 किमी उंचीवर आला. दुसऱ्या स्फोटानंतर ही उंची 2.5 किमीपर्यंत वाढली.” अल जझीरानुसार, इंडोनेशिया ‘रिंग ऑफ फायर’ क्षेत्रात येतो. पॅसिफिक महासागराजवळ घोड्याच्या बुटाच्या आकाराच्या टेक्टोनिक फॉल्ट रेषा आहेत. देशात 120 सक्रिय ज्वालामुखी आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App