corona epidemic : जगात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. भारत आणि ब्राझीलला मागे सोडत आता इंडोनेशिया कोरोना महामारीचे नवीन हॉटस्पॉट बनले आहे. इंडोनेशियात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. येथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहेत. कोरोनाचा डेल्टा प्रकार या देशात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. Indonesia became the new epicenter of the corona epidemic leaving India and Brazil behind
वृत्तसंस्था
बाली : जगात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. भारत आणि ब्राझीलला मागे सोडत आता इंडोनेशिया कोरोना महामारीचे नवीन हॉटस्पॉट बनले आहे. इंडोनेशियात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. येथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहेत. कोरोनाचा डेल्टा प्रकार या देशात मोठ्या प्रमाणात पसरला आहे.
इंडोनेशियात दररोज सरासरी 57 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारी 1205 रुग्णांच्या मृत्यूबरोबर मृतांचा आकडा 71 हजारांच्या पुढे गेला आहे. साथीचा रोग सुरू झाल्यापासून देशात एकूण 545 डॉक्टरांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. हॉस्पिटल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. लिया जी. परताकुसुमा म्हणाले की, इंडोनेशियातील विषाणूमुळे देशातील दहा टक्के आरोग्य कर्मचारी आयसोलेट झाले आहेत. त्याच वेळी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा वापर क्षमतेपेक्षा पाच पट जास्त होत आहे.
इंडोनेशियाची एकूण लोकसंख्या 27 कोटींहून जास्त आहे. गेल्या काही महिन्यांत भारतात एक दिवसात कोरोनाचे जेवढे रुग्ण सापडत होते तेवढे येथे एका दिवसात आढळत आहेत. जर संसर्गाचा हा वेग कायम राहिला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जर लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली गेली नाही, तर देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते. कोरोनाच्या रुग्णसंख्येवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास परिस्थिती आणखी भीतिदायक बनू शकते. इंडोनेशियाचे आरोग्यमंत्री बुदी सादिकिन म्हणाले की, देशातील अनेक रुग्णालयांमध्ये अद्याप बेड रिक्त आहेत, परंतु डेल्टा प्रकाराचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बर्याच प्रांतांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे.
Indonesia became the new epicenter of the corona epidemic leaving India and Brazil behind
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App