बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताचा प्रज्ञानंद ठरला सर्वात तरुण उपविजेता, मॅग्नस कार्लसन विजयी


18 वर्षीय प्रज्ञानंदने अनुभवी कार्लसनविरुद्ध चांगली लढत दिली

विशेष प्रतिनिधी

बाकू (अझरबैजान) : पाचवेळा चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने बाकू येथे फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी अखेर तीन दिवसांत चार गेम आणि पहिल्या दोन दिवसांत चुरशीच्या लढतीनंतरअखेर  तिसऱ्या दिवशी टायब्रेकरमध्ये पाचवेळेचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा अनुभव भारतीय युवा खेळाडून प्रज्ञानंदवर भारी ठरला आणि कार्लसनने 18 वर्षीय प्रज्ञानंदाचा पराभव करत,  सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. Indias youngest Pragnananda ever runner up at the World Chess Championship Magnus Carlsen emerged victorious

कार्लसनने हा सामना 1.5 – 0.5 अशा फरकाने जिंकला. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू हिकारू नाकामुरा आणि तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू फॅबियानो कारुआना यांचा पराभव करून प्रज्ञानंदने कार्लसनविरुद्ध अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र अंतिम फेरीतही अटीतटीची लढत दिल्यानंतर त्याला यश मिळवता आले नाही.

पहिल्या वेगवान गेममध्ये, 18 वर्षीय प्रज्ञानंदने अनुभवी कार्लसनविरुद्ध चांगली लढत दिली आणि एका टप्प्यावर पहिला गेम निघून जाईल असे वाटत होते, परंतु शेवटच्या पाच मिनिटांचे दडपण आणि कार्लसनच्या अनुभवाने सर्व काही चटकन उलटले. आणि एकदा या जेतेपदाच्या सामन्याच्या टायब्रेकरच्या सुरुवातीच्या गेममध्ये प्रज्ञानंदचा पराभव झाला की इथून पुढे सर्व काही त्याच्या हाताबाहेर गेले.

Indias youngest  Pragnananda ever runner up at the World Chess Championship Magnus Carlsen, emerged victorious

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात