वृत्तसंस्था
ओटावा : भारताने कॅनडावर मोठा डिप्लाेमॅटिक स्ट्राइक (कूटनीती प्रहार) सुरू केला आहे. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव टोरंटो, ओटावा आणि व्हँकुव्हर येथील उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासातून कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. कॅनेडियन नागरिकांना इतर कोणत्याही देशातून भारताचा व्हिसा मिळू शकणार नाही.India’s diplomatic strike on Canada; India blocks visas for Canadian citizens; Embassy staff reduction orders
याआधी मंगळवारी कॅनडाने आपल्या नागरिकांना भारताच्या काही भागात न जाण्याचा सल्ला दिला होता. बुधवारी भारतानेही असाच सल्ला जारी केला. यानंतर कॅनडाने रात्री उशिरा भारताचा सल्ला फेटाळला. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेबनेक यांनी ओटावा येथे मीडियाशी बोलताना सांगितले की, त्यांचा देश पूर्णपणे सुरक्षित आहे.
भारताने अॅडव्हायझरीत सुरक्षित राहण्यास सांगितले होते
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक अॅडव्हायझरी जारी केली होती. ज्यामध्ये म्हटले होते – कॅनडात सुरू असलेल्या भारतविरोधी कारवाया पाहता तेथे राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अलीकडच्या काळात, भारतीय मुत्सद्दी आणि कॅनडामध्ये उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाच्या विशिष्ट वर्गाला धमकावले जात असल्याचे दिसून आले आहे. भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणारे हेच लोक आहेत.
अॅडव्हायझरीनुसार, कॅनडातील बिघडलेली सुरक्षा परिस्थिती पाहता तेथे उपस्थित असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय समुदाय आणि विद्यार्थी उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांच्या वेबसाइटवर तक्रारी नोंदवू शकतात.
पन्नूच्या कॅनडातील धमकीवर हिंदू संघटनेने ट्रूडो सरकारला पत्र लिहिले
दुसरीकडे, बुधवारी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना देश सोडण्याची धमकी दिली होती. यावर कॅनडाच्या हिंदूंनी जस्टिन ट्रुडो सरकारला पत्र लिहिले आहे. पत्रात पन्नूच्या वक्तव्यावर चिंता व्यक्त करण्यात आली असून याला द्वेषपूर्ण गुन्हा घोषित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कॅनेडियन हिंदू संघटना ‘हिंदू फोरम कॅनडा’ने सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लेन यांना हे पत्र लिहिले आहे. हिंदू संघटनेने आपल्या पत्रात म्हटले आहे की, पन्नू यांनी त्यांचे आणि त्यांच्या खलिस्तानी सहकाऱ्यांचे मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. त्यांना त्यांच्या विचारधारेशी सहमत नसलेल्या लोकांना लक्ष्य करायचे आहे. कॅनडाच्या सरकारने याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
पन्नूचे हे विधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून घेतले जाणार का, असा सवालही या पत्रात करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App