भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा २६ डिसेंबरपासून; नव्या वेळापत्रकाची घोषणा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा २६ डिसेंबरपासून सुरु होत आहे. ओमीक्रोन प्रसारामुळे दौरा लांबणीवर टाकला आहे. तो खरे तर १६ डिसेंबरपासून सुरु होणार होता. Indian cricket team tour of South Africa from December 26; Announcement of new schedule

क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (CSA) भारताविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले. ज्यामध्ये तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. नवीन वेळापत्रकानुसार, भारत २६ डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.


माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन यानी केले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक


सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये हा सामना होणार आहे. उभय संघांमधील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल. तिसरी केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवली जाईल.

यानंतर उभय संघांमधील तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होईल. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १९ जानेवारी रोजी पार्ल येथे, दुसरा सामना पार्ल येथे आणि तिसरा आणि अंतिम केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवला जाईल.

Indian cricket team tour of South Africa from December 26; Announcement of new schedule

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात