विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – इस्राईलमध्ये सध्या ‘ब्लू फ्लॅग २०२१’ हा आंतरराष्ट्रीय हवाई सराव सुरू असून त्या सरावामध्ये भारताबरोबर जर्मनी, इटली, ब्रिटन, फ्रान्स, ग्रीस आणि अमेरिकेच्या हवाई दलांच्या तुकड्या सहभागी झाल्या आहेत.India is part of Blue flag exersice
या सरावात सात देशांतील चौथ्या आणि पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांचा सहभाग आहे. दर दोन वर्षांनी या सरावाचे आयोजन केले जाते. यंदाचा सराव सर्वात अत्याधुनिक आणि मोठा आहे. इस्राईलच्या स्थापनेनंतर तेथे प्रथमच ब्रिटिश हवाई दलाचे पथक, भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांची तुकडी गेली आहे.
तसेच फ्रान्सच्या हवाई दलातील राफेल लढाऊ विमानाची तुकडीही प्रथमच गेली आहे़, असे इस्राईलच्या हवाई दलाने म्हटले आहे. विविध राष्ट्रांबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी हा सराव आयोजित केला जात असल्याचे इस्राईलच्या हवाई दलाच्या वतीने सांगण्यात आले.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इस्राईलमधील ‘ओव्हडा एअरबेस’वर भेट देत या सरावाची पाहणी केली. त्यांनी भारतीय हवाई दलाच्या पथकासोबतचे फोटो ट्विट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी ‘भारतीय आणि इस्राईलच्या संबंधांचा मुख्य आधार संरक्षण आहे,’ असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App