बांगलादेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस तलावात पडली, १७ जणांचा मृत्यू, ३५ जखमी!

क्षमतेपेक्षा  अधिक प्रवासी  घेऊन ही बस निघाली होती.

विशेष प्रतिनिधी

ढाका : बांगलादेशातील झालाकाथी सदर उपजिल्हामधील छत्रकांडा भागात काल एक प्रवासी बस तलावात पडल्याने तीन मुलांसह किमान १७ जणांचा मृत्यू झाला, तर ३५ जण जखमी झाले आहेत, असे डेली स्टारने वृत्त दिले आहे. In Bangladesh a bus full of passengers fell into a lake 17 people died 35 were injured

बशर स्मृती परिवहनाची बारीशालाकडे जाणाऱ्या या बसची प्रवासी क्षमता ५२ होती परंतु बसमध्ये ६० प्रवासी होते. सकाळी ९ वाजता पिरोजपुर येथील भंडरिया  येथून निघालेली ही बस साधारणपणे १० वाजता बरिशाल खुलना महामार्गावर छत्रकांडा येथील रस्त्यालगतच्या एका तलावात पडल्याने ही दुर्घटना घडली.

बस तलावात पडल्यानंतर काही प्रवाशांना बाहेर पडण्यात यश आले, परंतु १७ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ३५ प्रवासी जखमी असून त्यांच्या स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

In Bangladesh a bus full of passengers fell into a lake 17 people died 35 were injured

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात