गुंतवणुकीतून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गोंदियामधील व्यावसायिकाची ५८ कोटींची फसवणूक


 आरोपीच्या घरातून चार किलो सोने अन् तब्बल २०० किलो चांदी जप्त

विशेष प्रतिनिधी

गोंदिया :  गोंदियामध्ये एका व्यावसायिकाची ५८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकीने बनावट सट्टेबाजी अॅप्समध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून नागपूरच्या एका व्यावसायिकाला  तब्बल ५८ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली. 58 Crore fraud of a businessman in Gondia by promising huge return from investment

नागपूर पोलिसांनी काका चौकातील रहिवासी असलेल्या आरोपी बुकीच्या घरावर छापा टाकून सुमारे 17 कोटी रुपये रोख, सुमारे 4 किलो सोने आणि 200 किलो चांदी जप्त केली. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या छाप्यापूर्वीच आरोपी घरातून पळून गेले. त्याच्या शोधासाठी छापे टाकण्यात येत आहेत.

ऑनलाइन जुगारात 58 कोटी 42 लाख रुपये गमावल्यानंतर नागपूरच्या व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. कारवाई करत पोलिसांनी आरोपी अनंत उर्फ ​​सोंटू नवरतन जैन याच्या गोंदिया येथील घरावर छापा टाकला. सोंटूच्या घराच्या झडतीत 14 किलो सोने आणि 200 किलो चांदीसह 17 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. यातील बहुतांश सोने हे बिस्किटांच्या स्वरूपात आहे. जप्त केलेली चांदी आणि रोख रक्कम ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मोजणी सुरू केली असून, ही मालमत्ता किती आहे, हे पोलिसांनी अद्याप सांगितलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छापा टाकण्याच्या एक दिवस आधी आरोपी बुकी शुक्रवारी दुबईला पळून गेल्याचा संशय आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, जैन याने तक्रारदार व्यावसायिकाला पैशाचे आमिष दाखवून सापळा रचला. हा व्यावसायिक जैनच्या जाळ्यात पडला आणि त्याने हवाला एजंटमार्फत 8 लाख रुपये हस्तांतरित केले. जैन यांनी व्यावसायिकाला ऑनलाइन जुगार खाते उघडण्यासाठी व्हॉट्सअॅपवर लिंक दिली. व्यावसायिकाने या खात्यात आठ लाख रुपये जमा करून जुगार खेळण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पाच कोटी रुपये कमवण्यात यश आल्यानंतर या व्यावसायिकाला जुगाराचे व्यसन जडले. मात्र नंतर या ऑनलाइन जुगारात त्याला 58 कोटी 42 लाख रुपये गमवावे लागले. पोलिसांनी आयपीसी कलम 420, 468, 386, 120(बी), 66(डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

58 Crore fraud of a businessman in Gondia by promising huge return from investment

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात