विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – आपण तालिबान कट्टरपंथीयांचे समर्थक आहोत. तसेच तालिबानची कोणत्याही प्रकारे सशस्त्र संघटना नसून ते सर्वसामान्य नागरिक आहेत, अशी मुक्ताफळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उधळली आहेतImran Khan defends tliban once again
अमेरिकेच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पाकिस्तानात तालिबानींना सुरक्षित आश्रय दिला जात असल्याबद्धल इम्रान म्हणाले की, ते सुरक्षित कोठे आहेत. ११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्कमध्ये जे काही घडले, त्याचे पाकिस्तानशी काही देणेघेणे नव्हते.
असे असतानाही अफगाणिस्तानात झालेल्या अमेरिकेच्या युद्धात हजारो पाकिस्तानी नागरिकांचा बळी गेला. अल कैदाने जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला तेव्हा त्यात एकही पाकिस्तानी नागरिक सामील नव्हता. त्यावेळी तालिबानचा कोणताच मुलगा पाकिस्तानात नव्हता, असा दावा इम्रान खान यांनी केला.
अमेरिका आणि तालिबानच्या युद्धात ७० हजाराहून अधिक पाकिस्तानी नागरिक ठार झाले आहेत. अफगाणिस्तानातील युद्धामुळे पाकिस्तानचे दीडशे अब्ज डॉलर नुकसान झाले आहे.
इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तानच्या सीमेवर ३० लाख निर्वासितांच्या छावण्या आहेत. तेथे शिबिर भरले आहेत. काही छावण्यात एक लाख तर काही ठिकाणी पाच लाख लोक आहेत. यात नागरिक देखील आहेत. अशावेळी एखादा देश या छावण्यांवर कशी कारवाई करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App