विशेष प्रतिनिधी
हाँगकाँग – हाँगकाँगमध्ये लोकशाहीवादी चळवळीचा बीमोड व्हावा म्हणून चीनने गतवर्षी लागू केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली पहिली कारवाई झाली आहे. Hotel waiter jailed in Hong Kong
एका वेटरला नऊ वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला. तोंग यिंग-कित असे त्याने नाव असून तो २४ वर्षांचा आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर त्याच दिवशी हाँगकाँगमध्ये निदर्शने झाली. एक जुलै रोजी तोंग याने तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या अंगावर दुचाकी घातली. याबद्दल त्याच्यावर दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला. याशिवाय त्याने सरकारचा निषेध करणारा फलक झळकाविला. त्याबद्दल त्याच्यावर फुटीरतावादाचा आरोप ठेवण्यात आला. दोन्ही आरोपांत तो दोषी आढळला.
तोंग याचे वकील लॉरेन्स लाऊ यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, या निर्णयाला आम्ही आव्हान देऊ. वेळ फार वेगाने पुढे सरकत असते. तोंग याला पाठिंबा दिल्याबद्दल आणि काळजी व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. तोंग याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App