वृत्तसंस्था
तेल अवीव : Hamas जवळपास २१ महिन्यांपर्यंत सुरू असलेला संघर्ष आणि मानवी संकटानंतर गाझात शांततेची शक्यता दिसत आहे. हमासने घोषणा केली की, तो इस्रायलसोबत युद्धविरामासाठी तयार आहे. या विधानासोबत दोन्ही पक्षांत अंतिम टप्प्यातील चर्चेनंतर युद्धविरामाची औपचारिक घोषणा शक्य झाली आहे.Hamas
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, पुढील आठवड्यात कराराची घोषणा होऊ शकते. पहिल्या टप्प्यात ६० दिवसांचा युद्धविराम लागू होईल. दोन्ही पक्षांनी अटीचे पालन केल्यास तो कायम करारात रूपांतरित होऊ शकतो.इस्रायलने याआधीच युद्धविरामावर संमती व्यक्त केली आहे. या प्रस्तावात अमेरिका आणि कतारने मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. नव्या पुढाकारात हमी दिली की, अमेरिका वाटाघाटी कायम ठेवेल.Hamas
युद्धविराम : पहिला टप्पा ६० दिवसांचा, पहिल्या दिवशी हमास ८ इस्रायली सोडणार
कराराचा अवधी : सुरुवातीस ६० दिवस अवधी. ओलिसांची सुटका : हमासच्या ताब्यातील ५० इस्रायली आहे. ओलिसांची सुटका चार टप्प्यांत होईल. पहिल्या दिवशी ८ ओलिस सुटतील. हे कोणत्याही उत्सवाविना होईल. इस्रायल पॅलेस्टिनी कैद्यांचीही सुटका करेल. लष्कराची वापसी : ओलिसांच्या पहिल्या खेपेनंतर इस्रायल उत्तर गाझातून सैन्य मागे हटवण्यास सुरुवात करेल. कायम युद्धविरामावर चर्चा : या ६० दिवसांत दोन्ही पक्ष स्थायी युद्धविरामासाठी थेट चर्चा करतील.
पुढे काय… इराण युद्धानंतर मवाळ नेतन्याहूंसमोर मोठी आव्हाने
इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू दीर्घकाळापासून हमासचा लष्करी ढाचा नष्ट करण्यास आपले प्राधान्य ठरवत होता. मात्र, इराण युद्धानंतर ते मवाळ पडले. नेतन्याहू यांनी आता हे स्पष्ट केले की, ओलिसांची परती सर्वोच्च प्राधान्य आहे. मात्र, त्यांना आपल्या आघाडीत कट्टरपंथी सहकाऱ्यांना समाधानी ठेवणे सोपे नसेल. यासोबत हमासच्या आतही अनेक गट आहेत. हे चित्र गाझा येथील खान युनूस येथे मदत साहित्याची वाट पाहणाऱ्या लोकांचे आहे. युनो समर्थित अंदाजानुसार, गाझाची संपूर्ण लोकसंख्या (२१ लाख) उपासमारीच्या गंभीर धोक्यात आहे.
ट्रम्प कठोर, कतार-इजिप्तच्या कूटनीतीने युद्धविरामाचा मार्ग तयार
ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांत या प्रस्तावाला अंतिम संधी ठरवत हमासला तो स्वीकारण्याचा इशारा दिला होता. ट्रम्प यांनी सांगितले होते की, हमासने हा करार केला नाही तर यापेक्षा दुसरा चांगला करार मिळणार नाही. उलट स्थिती आणखी वाईट होईल. या प्रस्तावाला आकार देण्यात कतार-इजिप्तची भूमिका राहिली. दोघांनी इस्रायल-हमास दरम्यान डीलसाठी अप्रत्यक्ष चर्चा घडवली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App