गुगल अँटी ट्रस्ट प्रकरण; फोनच्या डिफॉल्ट पर्यायातून माघार घेऊ शकते दिग्गज कंपनी, निकालाची प्रतीक्षा

वृत्तसंस्था

कॅलिफोर्निया : अमेरिकेत फोनच्या डिफॉल्ट पर्यायातून गुगल माघार घेऊ शकते. गेल्या 25 वर्षांतील सर्वात मोठ्या अँटी ट्रस्ट प्रकरणात अमेरिकन न्याय विभागाने खटला जिंकला तर फोनच्या स्क्रीनवर अनेक सर्च इंजिनचे पर्याय दिसतील. सुमारे 10 आठवड्यांपासून या प्रकरणावर सुनावणी घेणारे न्या. अमित मेहता हे लवकरच निकाल देऊ शकतात.Google Anti-Trust Case; The giant may withdraw from the phone’s default option, pending the verdict

अमेरिकन न्याय विभागाने याप्रकरणी गुगलवर सर्च आणि जाहिरातीवरून बेकायदेशीर पद्धतीने एकाधिकार मिळवल्याचा आरोप केला आहे. कंपनीने युजरच्या सवयीत बदल करत कोट्यवधी रुपये कमावल्याचे सुनावणीदरम्यान समोर आले. यामध्ये बदलासाठी नवे पर्याय असणे गरजेचे आहे.



मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी सुनावणीदरम्यान दावा केला की, गुगलने युजरला हिप्नोटाइज करून ठेवले आहे. ते म्हणाले, आपण सकाळी उठतो, ब्रश करतो आणि त्यानंतर गुगलवर सर्च करतो. ही सवय बदलण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे गुगलला फोन आणि वेब ब्राउझरच्या डिफॉल्ट पर्यायातून हटवण्यात यावे.

वस्तुत: सर्च इंजिनवर डिफॉल्ट पर्याय कायम राहण्यासाठी गुगलकडून अब्जावधी रुपये खर्च केले जातात. एकट्या ॲपललाच कंपनीने यासाठी दरवर्षी 166 कोटी रुपये दिले आहेत. न्याय विभागाचा मुख्य युक्तिवादही याबद्दलच आहे.

Google Anti-Trust Case; The giant may withdraw from the phone’s default option, pending the verdict

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात