France’s Macron Supports Modi Govt : भारतातील कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेदरम्यान भारतात अभूतपूर्व परिस्थिती तयार झाली आहे. भारताने आजवर जगाला पुरवलेल्या लसींवरून आता काही जण टीका करू लागले आहेत. परंतु मानवतेच्या दृष्टिकोनातून जगाला लस पुरवणाऱ्या भारताने कोणाचेही लेक्चर ऐकून घेण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केले आहे. France’s Macron Supports Modi Govt Says India Doesn’t Need Vaccine Supply Lectures; Has Exported For Humanity
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतातील कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेदरम्यान भारतात अभूतपूर्व परिस्थिती तयार झाली आहे. भारताने आजवर जगाला पुरवलेल्या लसींवरून आता काही जण टीका करू लागले आहेत. परंतु मानवतेच्या दृष्टिकोनातून जगाला लस पुरवणाऱ्या भारताने कोणाचेही लेक्चर ऐकून घेण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केले आहे.
शनिवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, लस पुरवठ्याबाबत भारताला कोणतेही भाषण ऐकण्याची गरज नाही. युरोपियन युनियन (ईयू) देशांच्या नेत्यांच्या व्हर्च्युअल शिखर बैठकीत मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना म्हटले की, “भारताने बहुसंख्य देशांना लसीची मदत करून पुष्कळ’मानवतेची’ निर्यात केली आहे.
पंतप्रधान मोदींनी परिषदेत ईयूच्या सर्व 27 देशांना टीआरआयपीएस सवलतीवरील डब्ल्यूटीओ बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन केले जेणेकरून प्रत्येकाला स्वस्त कोरोना लसी आणि कमी खर्चात उपचार देता येतील. दरम्यान, भारत-ईयूने संतुलित, महत्त्वाकांक्षी आणि सर्वसमावेशक मुक्त व्यापार करारावर 8 वर्षांनंतर पुन्हा चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी विस्तृत भागीदारी सुरू केली गेली. याशिवाय स्वतंत्र गुंतवणूक संरक्षण करारावरही वाटाघाटी सुरू झाल्या.
परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी ईयू देशातील सर्व 27 देशांमधील प्रमुखांशी केलेली आभासी बैठक अत्यंत यशस्वी ठरली. या बैठकीत दोन्ही बाजूंच्या चर्चेत व्यापार, गुंतवणूक आणि संपर्क क्षेत्रात सर्व प्रकारच्या सहकार्यात आणखी वाढ करण्यावर भर देण्यात आला. दोन्ही बाजूंनी सातत्याने आणि सर्वसमावेशक संपर्क भागीदारीसुद्धा सुरू करण्यात आली आणि संमेलनाला संबंधांतील नवीन टर्निंग पॉइंट म्हणून संबोधण्यात आले.
सर्व देशांच्या नेत्यांनी कोरोनाची साथ आणि आरोग्य सहकार्याबद्दलदेखील चर्चा केली. यावेळी कोरोनाविरुद्ध युद्धात भारताला ईयूची साथ मिळाली. गेल्या वर्षी कोरोनाशी लढताना भारताने केलेल्या मदतीची आठवण सर्व देशांनी केली आणि म्हटले की, भारताला सर्वतोपरी मदत दिली जाईल. पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
पोर्तुगाल सध्या ईयू परिषदेचे अध्यक्ष आहेत. युरोपियन युनियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी या बैठकीनंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ईयू नेत्यांच्या बैठकीत आम्ही भारत-ईयू सामरिक भागीदारीचा एक नवीन अध्याय उघडला आहे.” परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पक्षांनी शिखर परिषदेनंतर एक संयुक्त विधान जारी केले आणि असे नमूद केले की, आजच्या बैठकीत समान हितसंबंध, लोकशाही, स्वातंत्र्य, कायद्याचे शासन आणि मानवाधिकारांचा आदर ही मूल्ये आणि तत्त्वे रेखांकित करण्यात आली, जी आपल्या धोरणात्मक भागीदारीचे मूळ आहे. या भेटीसाठी पंतप्रधान मोदी पोर्तुगालला जाणार होते, परंतु कोरोना संकटामुळे ही यात्रा पुढे ढकलण्यात आली. यानंतर दोन्ही बाजूंनी व्हर्च्युअल संवादावर सहमती दर्शवण्यात आली होती.
कोरोनावरील लसीचे पेटंटमुक्त करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा आहे की नाही याबाबत युरोपियन संघाने शनिवारी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. भारत-युरोपियन युनियनच्या नेत्यांमधील शिखर परिषदेत या विषयावर चर्चा झाली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) विकास स्वरूप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन युनियनला कोरोनाविरोधी लसींचे पेटंट हक्क देण्याच्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. नेत्यांच्या बैठकीनंतर युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला फॉन डर लेन म्हणाल्या की, चर्चेसाठी हा महत्त्वाचा विषय होता. हे भविष्यातील विषय आहेत याची आम्हाला जाणीव आहे. अलीकडील आणि नजीकच्या भविष्यात हे चर्चेचे विषय नाहीत.
France’s Macron Supports Modi Govt Says India Doesn’t Need Vaccine Supply Lectures; Has Exported For Humanity
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App