कॉंग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन, मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी व्यक्त केला शोक

Congress leader Hardik Patel father dies due to corona in Ahmedabad, Chief Minister Vijay Rupani expressed grief

Hardik Patel father dies due to corona : गुजरात कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांच्या वडिलांचे अहमदाबादमधील रुग्णालयात कोरोनाच्या संसर्गामुळे रविवारी निधन झाले. पक्षाच्या एका नेत्याने ही माहिती दिली आहे. निधनाचे वृत्त समजताच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी पटेल यांच्याशी फोनवर बोलून संवेदना व्यक्त केल्या आहेत. Congress leader Hardik Patel father dies due to corona in Ahmedabad, Chief Minister Vijay Rupani expressed grief


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : गुजरात कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांच्या वडिलांचे अहमदाबादमधील रुग्णालयात कोरोनाच्या संसर्गामुळे रविवारी निधन झाले. पक्षाच्या एका नेत्याने ही माहिती दिली आहे. निधनाचे वृत्त समजताच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी पटेल यांच्याशी फोनवर बोलून संवेदना व्यक्त केल्या आहेत.

भारतीय युवा कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष निखिल सावानी म्हणाले की, “हार्दिक पटेल यांचे वडील भरत पटेल यांचे रविवारी शहरातील यूएन मेहता रुग्णालयात निधन झाले. कोरोना संसर्गानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.”

हार्दिक पटेल हेसुद्धा सध्या कोरोनाग्रस्त आहेत. 2 मे रोजी हार्दिक पटेल यांनी ट्विटद्वारे आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यांनी लिहिले होते की, “आज मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार चालू आहेत. तुमच्या प्रेम व प्रार्थनेने लवकरच बरा होईल.”

गुजरातमध्ये कोरोनामुळे चिंताजनक स्थिती

मागच्या 24 तासांत गुजरातमध्ये कोरोनाचे नवे 11,892 रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील एकूण बाधितांचा आकडा हा 6,69,928 वर गेला आहे. याशिवाय आणखी 119 रुग्णांच्या मृत्युमुळे मृतांची एकूण संख्या 8,273 वर गेली आहे. गुजरात आरोग्य विभागाच्या मते, दिवसभरात किमान 14,737 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. यामुळे राज्यातील 5,18,234 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 1,43,421 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Congress leader Hardik Patel father dies due to corona in Ahmedabad, Chief Minister Vijay Rupani expressed grief

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात