President Macron in Hindi : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अत्यंत चिंताजनक परिस्थिती तयार झाली आहे. आता अमेरिका, ऑस्ट्रेलियापाठोपाठ फ्रान्सनेही मदतीचा हात दिला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि ऑक्सिजन जनरेटर पाठविण्याची घोषणा केली आहे. त्यांनी याबाबत फेसबुकवर हिंदीमध्ये भावनिक पोस्ट लिहिली आहे. France support to India against Corona pandemic, Emotional message from President Macron in Hindi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अत्यंत चिंताजनक परिस्थिती तयार झाली आहे. आता अमेरिका, ऑस्ट्रेलियापाठोपाठ फ्रान्सनेही मदतीचा हात दिला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि ऑक्सिजन जनरेटर पाठविण्याची घोषणा केली आहे. त्यांनी याबाबत फेसबुकवर हिंदीमध्ये भावनिक पोस्ट लिहिली आहे.
इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लिहिले की, “आपण ज्या महामारीतून जात आहोत, त्यापासून कोणीही दूर राहिलेला नाही. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की, भारत एका कठीण परिस्थितीतून जात आहे. फ्रान्स आणि भारत नेहमीच एकजूट राहिलेले आहेत. आम्ही आमची मदत देण्यासाठी तत्पर आहोत. फ्रान्स भारताला वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि 8 ऑक्सिजन जनरेटर पाठवेल. प्रत्येक जनरेट सभोवतालच्या हवेतून ऑक्सिजन तयार करून एका रुग्णालयाला 10 वर्षांसाठी आत्मनिर्भर बनवू शकतो.”
पुढे त्यांनी लिहिले, ‘आमच्या मंत्रालयांचे विभाग कठोर परिश्रम घेत आहेत. आमच्या फ्रेंच कंपन्या एकत्र येत आहेत आणि त्या आधीच मोठ्या संख्येने सुरू आहेत! एकता आपल्या देशांच्या केंद्रात आहे. ती आमच्या देशांमधील मैत्रीच्या केंद्रस्थानी आहे. आपण एकत्र येऊन जिंकू.”
कोरोनाविरुद्धच्या या लढाईत अमेरिका आणि फ्रान्सशिवाय युनायटेड किंगडम, जर्मनी आणि चीनसहित अनेक देशांनी भारताला मदतीची घोषणा केली आहे. काही देशांनी पाठवलेले मदतीचे साहित्य भारताच्या विमानतळांवर उतरायलाही सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारताने कठीण काळात अनेक देशांना मदत केली होती. लस आल्यानंतर अनेक देशांना लसीचा पुरवठा केला होता.
France support to India against Corona pandemic, Emotional message from President Macron in Hindi
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App