विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : निवडणुकीत पैसे वाटपाच्या तक्रारी अनेकदा होतात. परंतु, पैसे वाटल्याप्रकरणी न्यायालयाकडून प्रथमच शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका महिला खासदाराला ही सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.For the first time, the court handed down a sentence in the election money barbary case, Telangana Rashtra Samiti woman MP jailed for six months,
तेलंगणा राष्ट्र समितीच्या खासदार मलोत कविता यांना मागील लोकसभा निवडणूक काळात मतदारांना पैसे वाटप केल्याप्रकरणी न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
2019 मधील लोकसभा निवडणूक काळात प्रचारादरम्यान बर्गमपहाड मतदारसंघात काही कार्यकर्ते प्रत्येक मतासाठी 500 रुपये वाटत असल्याचे पोलिसांना दिसून आले. यावेळी मलोत कविता यांचा सहकारी शौकत अली याला पोलिसांनी पैसे वाटताना रंगेहात पकडले होते.
चौकशीत त्याने कविता यांच्यासाठी काम करीत असल्याचे सांगितले. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर पोलिसांनी पुराव्यांसह पैसे वाटपाची बाब सिद्ध केली. यावेळीही शौकतने मनोत कविता यांच्या आदेशावरूनच काम करीत असल्याची साक्ष दिली होती. त्यामुळे न्यायालयानेत कविता यांना सहआरोपी करून घेत, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी शिक्षा होण्याची ही पहिली वेळ असली तरी अन्य काही गुन्ह्यासाठी या राज्यातील खासदारांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे
भाजपा खासदार राजासिंह यांना पोलिस कर्मचाºयाला मारहाण, तर तेलंगणा राष्ट्र समितीचे खासदार दानम नागेंद्र यांना अन्य एका सरकारी अधिकाºयाला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App