वृत्तसंस्था
केप कॅनव्हेराल – मंगळ ग्रहावर लँड झालेल्या ‘नासा’च्या ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने दुसऱ्यांदा चाचणी उड्डाण केले. Enjunity land on Mars
‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने काल ५२ सेकंद उड्डाण करत १६ फूट उंची गाठली. याशिवाय सात फूटापर्यंत बाजूच्या दिशेनेही ते गेले. पहिल्या चाचणीवेळी हे हेलिकॉप्टरने १० फुटांची उंची गाठली होती, तर ते ३९ सेकंद हवेत होते.
राइट बंधूंनी १९०३ मध्ये प्रथम उडविलेल्या विमानाचा एक बारीक तुकडा ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरमध्ये ठेवण्यात आला आहे. मंगळावर हेलिकॉप्टर उडविण्यात कोणत्या अडचणी येतात, याचा अभ्यास आणि चाचणी सध्या सुरु आहे. मंगळावरील वातावरण पृथ्वीवरील वातावरणाच्या तुलनेत अत्यंत विरळ आहे.
येत्या एक ते दीड आठवड्यात आणखी तीन चाचण्या घेण्याचा ‘नासा’चे नियोजन आहे. ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने सोमवारी प्रथम उड्डाण केल्याने ते ‘परग्रहावर उडालेले पहिले हेलिकॉप्टर’ ठरले होते.
महत्वाच्या’ बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App