mehul choksi : कॅरेबियन देश डोमिनिका येथे आर्थिक गुन्ह्याबद्दल फरार मेहुल चोकसीला भारतात आणण्याची आशा धुसर झाली आहे. डोमिनिकाच्या कोर्टाने चोकसीची याचिका स्वीकारत सुनावणी संपेपर्यंत देशातच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच चोकसीला आपल्या वकिलांना भेटण्याची परवानगी देऊन कोविड विलगीकरणासाठी चाचणी करण्यासही सांगण्यात आले आहे. eastern caribbean supreme court puts stay on mehul choksi repatriation from dominica
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॅरेबियन देश डोमिनिका येथे आर्थिक गुन्ह्याबद्दल फरार मेहुल चोकसीला भारतात आणण्याची आशा धुसर झाली आहे. डोमिनिकाच्या कोर्टाने चोकसीची याचिका स्वीकारत सुनावणी संपेपर्यंत देशातच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच चोकसीला आपल्या वकिलांना भेटण्याची परवानगी देऊन कोविड विलगीकरणासाठी चाचणी करण्यासही सांगण्यात आले आहे.
याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी कोर्टाने 2 जून 2021 रोजी ठेवली आहे. 28 मे रोजी सकाळी बंद चेंबरमध्ये झालेल्या सुनावणीत डोमिनिका येथील कॅरिबियन उच्च न्यायालयाने मेहुल चोकसीला कोविड चाचणी व उपचारासाठी डोमेनिका-चायना रुग्णालयात नेण्यास मान्यता दिली आहे. तसेच कोविड चाचणीचा निकाल येईपर्यंत मेहुलला सरकार आणि बचाव पक्षाच्या परस्पर संमतीने असुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येईल.
पोलीस कोठडीतून बाहेर पडल्याने चोकसीला दिलासा मिळाला आहे. परंतु त्याची कोठडी अद्याप अबाधित आहे. दरम्यान, चोकसीला आपल्या वकिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, डोमिनिका पोलिसांनी भेटण्याची परवानगी दिली नसल्याचा आरोप वकील वेन नॉर्डी, वेन मार्श यांनी कोर्टापुढे केला.
23 मे रोजी अँटिग्वामध्ये मेहुल चोकसी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली गेली होती. त्यानंतर त्याच्या शोधासाठी लूक आउट नोटीस बजावण्यात आली. 26 मे रोजी चोकसीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली. यावर अँटिग्वा-बार्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी डोमिनिका सरकारला चोकसीला परत पाठविण्याऐवजी भारताकडे देण्याची विनंती केली. पण त्याऐवजी डोमिनिकाने त्याला अँटिगा-बार्बुडा येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. तथापि, चोकसीच्या वकिलांनी डोमिनिकाच्या कोर्टात अपील दाखल केले आणि हद्दपारीवर स्थगिती मिळवली.
eastern caribbean supreme court puts stay on mehul choksi repatriation from dominica
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App