विशेष प्रतिनिधी
रियाध : सौदी अरेबियाच्या यान्बू बंदराजवळ स्फोटकांनी भरलेल्या बोटीचा स्फोट घडवून हल्ला करण्यात आला. लाल समुद्रातील या बंदराजवळ पोहोचण्याआधीच या बोटीला नष्ट करण्यातDrone attack on Saudi port
आल्याचा दावा सौदी अरेबियाने केला असला तरी या घटनेमुळे यामुळे बंदरातील वाहतूक काही काळ ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले.रिमोट कंट्रोलच्या साह्याने ही बोट बंदराच्या दिशेने सोडण्यात आली होती.
येमेनमधील हौथी बंडखोरांविरोधात सौदी अरेबियाची मोहिम सुरु असून या बंडखोरांना इराणचे पाठबळ असल्याचा सौदीचा आरोप आहे. हौथी बंडखोरांनी याआधी अनेक वेळा सौदीवर ड्रोनच्या साह्याने हल्ला केला असल्याने आजचा हल्लाही त्यांनीच केला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कोणत्या संघटनेने अथवा देशाने घेतलेली नाही. मात्र, यामुळे आखाती देशांमध्ये असलेला वाद पुन्हा एकदा समोर आला असून या वादामध्ये इस्राईल आणि इराण यांच्या वादाचीही जोड आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App