वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : पॉर्न स्टारप्रकरणी दोषी ठरलेले माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मॅनहॅटन कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्रपती निवडणुकीनंतर त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, या खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश जुआन मार्चेन यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या शिक्षेची घोषणा २६ नोव्हेंबरला केली जाईल.
अमेरिकेत ५ नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. ट्रम्प यांना जुलैमध्येच शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र, त्यानंतर ती 18 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता ती आणखी 68 दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे.
खरं तर, या वर्षी 30 मे रोजी, न्यायालयाने ट्रम्प यांना 34 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले होते पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प करण्यासाठी पैसे देणे आणि 2016 च्या निवडणूक प्रचारादरम्यान व्यावसायिक रेकॉर्ड खोटे दाखवणे अशा गुन्ह्यात दोषी आढळलेले ट्रम्प हे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
Chanda Kochhar : चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; व्हिडिओकॉन कर्ज फसवणूक प्रकरण
न्यायाधीश म्हणाले – या निकालाचा राष्ट्रपतींच्या निवडणुकीवर प्रभाव पडण्याची शक्यता
न्यायाधीश मार्चेन म्हणाले की, जर 18 सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात आली, तर हे सर्व निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासारखे होईल. ते म्हणाले की, शिक्षेची तारीख वाढवल्याने निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
उल्लेखनीय आहे की, ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असल्याने त्यांना दोषी ठरवण्याचे प्रकरण संपुष्टात आणण्याची मागणीही सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more