लग्न झाल्यानंतर पतीसाेबत सासरी नांदत असलेल्या डॉक्टर पत्नीला डाॅक्टर पतीने ‘तु मला आवडत नाही, तुझा चेहरा आवडत नाही, तुझी उंची खूप लहान आहे, तुला चष्मा आहे, तुझ्यापेक्षा रुग्णालयातील इतर डाॅक्टर, सिस्टर छान दिसतात असे म्हणून तिचा शारिरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -डाॅक्टर झालेल्या तरुणीने आपल्या वैद्यकीय सेवेशी संलग्न असलेल्या डाॅक्टर तरुणाशी मागील वर्षी ऑगस्ट २०२१ मध्ये लग्न केले. लग्न झाल्यानंतर पतीसाेबत ती सासरी नांदत असताना डाॅक्टर पतीने ‘तु मला आवडत नाही, तुझा चेहरा आवडत नाही, तुझी उंची खूप लहान आहे, तुला चष्मा आहे, तुझ्यापेक्षा रुग्णालयातील इतर डाॅक्टर, सिस्टर छान दिसतात असे म्हणून तिचा शारिरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Doctor husband tolerate doctor wife because she is not looking good and her height is small
याप्रकरणी प्राजक्ता सुरज नागरगाेजे (वय-२९,रा.कात्रज,पुणे) या महिलेने पती सुरज नागरगाेजे (२८), सासु चंदुभागा नागरगाेजे, आजी सासु सखुबाई नागरगाेजे, सुखुबाई मुंढे, पतीचा मामा प्रल्हाद मुंढे यांचे विराेधात बिबवेवाडी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्राजक्ता नागरगाेजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती सुरज हा सातत्याने तुझा चेहरा आवडत नाही, तुझी उंची खूप लहान आहे असे वारंवार म्हणून मानसिक त्रास देत हाेता.
तसेच हाॅस्पिटल बांधण्यासाठी एक काेटी रुपये आणले नाही म्हणून शिवीगाळी करुन हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करुन लग्नात नीट मानपान केला नाही, भांडी दिली नाही असे वारंवार म्हणून शिवीगाळ करुन मानसिक व शारिरिक त्रास दिल्याने सदर पती व त्याच्या कुटुंबीया विराेधात काैटुंबिक हिंसाचार अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App