‘’संरक्षण सहकार्य हा आमच्या संबंधांचा मजबूत आधारस्तंभ’’ मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीनंतर मोदींचं विधान!

‘मेक इन इंडिया’चा उल्लेख करत मोदींनी दिली आहे प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी

पॅरीस :  पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘’फ्रान्स संपूर्ण जगात मानवतेसाठी ओळखला जातो. फ्रान्समध्ये असल्याचा त्यांना अभिमान आहे.’’ Defense cooperation is a strong pillar of our relations  Modis statement after the bilateral meeting with Macron

मोदी म्हणाले, “काल मला फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान मिळाला, हा संपूर्ण 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस हा जगासाठी ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’चे प्रतीक आहे. भारत आणि फ्रान्स नेहमीच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सोबत आहेत.”

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “संरक्षण सहकार्य हा आमच्या संबंधांचा मूलभूत स्तंभ आहे. हे दोन्ही देशांमधील खोल परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. मेक इन इंडिया आणि स्वावलंबी भारतामध्ये फ्रान्स हा महत्त्वाचा भागीदार आहे. पाणबुड्या असोत की नौदलाची जहाजे, आम्हाला केवळ आमच्याच नव्हे, तर तिसर्‍या मित्र देशांच्या सहकार्यासाठी एकत्र काम करायचे आहे.

Defense cooperation is a strong pillar of our relations  Modis statement after the bilateral meeting with Macron

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub