विशेष प्रतिनिधी
पुणे : 1975 ते 1990 या दशकात आपल्या अभिनयाने आणि रुबाबदार देखण्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टी गाजवणारे, सिनेमे देणारे अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी आकस्मित निधन झाले.मावळ तालुक्यातील आंबे या गावात ते गेल्या काही दिवसापासून वास्तव्यास होते . तिथेच त्यांचे शुक्रवारी बंद खोलीत निधन झाले. एका बंद खोलीत संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला. A famous Marathi actor Ravindra mahajani
दरम्यान शुक्रवारी त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याने . नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली . पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर . फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी आत मध्ये प्रवेश केला असता त्यांचा मृतदेह आढळून आला.झाला प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला . त्यानंतर पोलिसांनी त्यांचे पुत्र गश्मीर महाजनी यांना फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या अंदाजानुसार दोन ते तीन दिवसांपूर्वीच महाजनी यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.
रवींद्र महाजनी यांनी आपल्या चार दशकाच्या कला प्रवासात अनेक उत्तम भूमिका साकारल्या मधुसूदन कालेकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनी यांना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली. आणि त्यानंतर शांताराम बापूनी याचं नाटकाचा एक प्रयोग बघून महाजनी यांना झुंज या चित्रपटातं मुख्य भूमिका देऊ केली.आणि तिथून खऱ्या अर्थाने महाजनी यांना मराठी चित्रपट सृष्टीत ओळख निर्माण झाली. आणि मराठी चित्रपट सृष्टीला एक नवा तारा गवसला.
त्यानंतर आराम हराम आहे, लक्ष्मीची पावलं, लक्ष्मी, मुंबईचा जावई, देवता, गोंधळात गोंधळ , यासारखे सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले तर बेल भंडार, अपराधमीच केला, या नाटकातून त्यांनी मराठी रंगभूमीवर काम केलं. आत्ताच्या देऊळ बंद या सिनेमातं देखील त्यांनी काम होतं. त्यांच्या अशा या आकस्मित जाण्यांना सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App