वृत्तसंस्था
मॉस्को : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या आणखी एका जवळच्या मित्राचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. 46 वर्षीय खासदार व्लादिमीर एगोरोव यांचा मृतदेह गुरुवारी दुपारी टोबोल्स्क शहरात त्यांच्या घराखाली सापडला. रशियन न्यूज एजन्सी ‘टास’च्या रिपोर्टनुसार, एगोरोव खिडकीतून खाली पडले होते. Death of Another Leader Close to Putin; 7 near misses killed in 18 months
एगोरोव्ह यांना काही काळापूर्वीच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नंतर ते निर्दोष सिद्ध झाले. सप्टेंबर 2022 पासून पुतिन यांच्या जवळच्या 7 नेत्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. यापैकी 4 जणांचा घराच्या छतावरून किंवा खिडकीतून पडून मृत्यू झाला.
मृत्यूवरून चर्चांना उधाण
ब्रिटिश न्यूज वेबसाईट ‘मेट्रो’च्या रिपोर्टनुसार, एगोरोव यांनी काही दिवसांपूर्वीच पुतिन यांची भेट घेतली होती. ते पश्चिम सायबेरियातील टोबोल्स्क शहरात राहत होते. त्यांचे घर एका बहुमजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होते. गुरुवारी दुपारी त्यांचा मृतदेह घराखाली सापडला. पोलिस एगोरोवचा मृत्यू संशयास्पद मानत आहेत, त्यामुळे या प्रकरणाचा तपास विशेष गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
पुतीन यांनी मोदींचे केले कौतुक, रशियात येण्याचे विशेष निमंत्रणही दिले
एका स्थानिक मीडिया चॅनेलच्या मते, मृत्यूपूर्वी एगोरोव्हला हृदयविकाराचा झटका आला होता, परंतु ते खिडकीपर्यंत कसे पोहोचले आणि खाली पडले? याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचे एक कारण म्हणजे खिडकीची उंची मजल्यापासून सुमारे 5 फूट होती आणि बेशुद्ध अवस्थेतही तिथून खाली पडणे शक्य होत नाही.
अमेरिकन मीडिया हाऊस ‘फॉक्स न्यूज’ने या संदर्भात रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, तिथून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
एगोरोव्ह हे पेशाने वकील होते. 2016 मध्ये त्यांची शहर प्रशासन प्रमुख म्हणून निवड झाली. यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. विरोधी पक्ष एगोरोव्हच्या विरोधात ठोस पुरावे देऊ न शकल्यामुळे न्यायालयाने नंतर त्यांची निर्दोष मुक्तता केली. यानंतर ते पुतीन यांच्या युनायटेड रशिया पार्टीत सामील झाले आणि नंतर ते खासदार झाले. ते पुतीन यांच्या सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जात होते.
एका अहवालानुसार, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निकटवर्तीयांचे अनेकजण रशियात मारले गेले आहेत. विशेष म्हणजे या सर्व लोकांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रशियन सरकार बहुतेक प्रकरणांमध्ये स्पष्टीकरण देऊ शकले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App