वृत्तसंस्था
लंडन : ब्रिटनमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाच्या अत्यंत संक्रमणशील असलेल्या डेल्टा या बदललेल्या विषाणूमुळे ही लाट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात आली आहे. Corona Virus Infection Britain Third Wave Coronavirus Britain Due To A Mutated Virus
लसीकरण तज्ज्ञ प्रोफेसर अॅडम फिन यांनी सांगितले की, ब्रिटन हा लसीकरणाची लक्ष्यपूर्ती आणि डेल्टा विषाणूच्या आव्हानांचा सामना एकाचवेळी करीत आहे. ते म्हणाले की, रुग्णवाढ अधिक वेगाने होणार नाही, अशी अपेक्षा ठेवूया. पण ही तिसरी लाट सुरू आहे, असे ठामपणे म्हणता येईल. लसीकरण कार्यक्रम, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस देणे यावर ही तिसरी लाट कितपत रोखू शकतो, हे प्रामुख्याने अवलंबून आहे.
ब्रिटनमध्ये सर्व प्रौढ व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. सध्या ज्या वेगाने लसीकरण सुरू आहे, तो डेल्टाचे आव्हान परतवून लावण्यासाठी पुरेसा आहे काय, असे त्यांना विचारले. त्यावर त्यांनी सांगितले की, यावर ठामपणे काही सांगता येणार नाही, पण आशावादी राहण्यास हरकत नाही. कारण राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, रुग्णसंख्येत वाढ दिसत असली तरी ही वाढ आम्ही गेल्या आठवड्यात वर्तविलेल्या अंदाजा एवढी नाही.
त्यामुळे आपली लसीकरण मोहीम आणि डेल्टाचे संक्रमण यांच्यातील स्पर्धा सुरू झाली आहे. जेवढ्या लवकर आपण लसीकरण पूर्ण करू शकू, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना दुसरी मात्रा देऊ शकू, तेवढ्या कमी प्रमाणात रुग्णांना रुग्णालयांत ठेवण्याची गरज कमी भासेल. ही एक प्रमुख बाब आहे, कारण याआधी केवळ याच बाबींमुळे स्थिती गंभीर झाली होती. ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण केले, रुग्णालयांत दाखल करण्याची गरज कमी ठेवण्यात यशस्वी झालो, मृत्यूचे प्रमाण वाढले नाही, तर स्थिती पूर्वपदावर येऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App