Corona Outbreak In Brazil : कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार उडालेला आहे. ब्राझीलची अवस्था अत्यंत वाईट आहे. येथे स्मशानभूमीत दफन करण्यास जागा अपुरी पडत आहे. अशा परिस्थितीत येथे जुन्या कबरी रिकाम्या केल्या जात आहेत. या थडग्यांमधून सांगाडे काढून त्या जागी नुकत्याच मृत पावलेल्या व्यक्तींचा दफनविधी केला जात आहे. Corona Outbreak In Brazil, not enough space to bury the dead people
विशेष प्रतिनिधी
ब्रासिलिया / नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार उडालेला आहे. ब्राझीलची अवस्था अत्यंत वाईट आहे. येथे स्मशानभूमीत दफन करण्यास जागा अपुरी पडत आहे. अशा परिस्थितीत येथे जुन्या कबरी रिकाम्या केल्या जात आहेत. या थडग्यांमधून सांगाडे काढून त्या जागी नुकत्याच मृत पावलेल्या व्यक्तींचा दफनविधी केला जात आहे.
ब्राझीलमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. येथील कोरोनामुळे आतापर्यंत 3 लाख 25 हजार लोक मरण पावले आहेत. जगातील सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या शहरांपैकी साओ पावलो येथील नवीन काशोइरिन्हा कब्रिस्तानची छायाचित्रे काळजाचं पाणी करतात. येथे जुन्या कबरी खोदून नवीन मृतदेहांसाठी जागा केली जात आहे. स्मशानभूमीत सुमारे एक हजार थडग्यांमधून सांगाडे बाहेर काढण्यात आले आहेत.
थडग्यांमधून काढलेले सांगाडे इतर काही ठिकाणी पुरवण्यासाठी पॅक केले जात आहेत. रात्रंदिवस कबरींचे खोदकाम सुरू आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे. साओ पावलोच्या स्मशानभूमीत दररोज अनेक नवे मृतदेह येत आहेत. ब्राझीलमध्ये विषाणूचे दोन नवीन प्रकार सापडले आहेत. यामुळे चिंता अधिकच गडद झाली आहे.
मागच्या मार्च महिन्यातच ब्राझीलमध्ये 66 हजार जण मरण पावले आहेत. अमेरिकेनंतर कोरोनाने ब्राझीलमध्ये मोठा विनाश घडवला आहे. मागच्या एका आठवड्यापासून येथे दररोज सरासरी 75,500 प्रकरणे येत आहेत, तर 3 हजार मृत्यूंची नोंद होत आहे. ब्राझीलची ढासळणारी परिस्थिती पाहता ब्रिटनने येथून येणार्या विमानांवर बंदी घातली आहे.
Corona Outbreak In Brazil, not enough space to bury the dead people
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App